• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रीलंका येथे मच्छिमारांचे नेतृत्त्व रामकृष्ण तांडेल करणार

by Ganesh Dhanawade
September 10, 2025
in Old News
125 1
0
Ramakrishna Tandel will lead the fishermen
245
SHARES
699
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 :  श्रीलंका स्टिअरिंग कमिटी फॉर न्येलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती फॉर फूड सोव्हरिन्टी यांच्यावतीने फोरममध्ये सहभागी होण्यासाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही परिषद नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कँडी, श्रीलंका येथे होणार आहे. आशिया खंडातील मच्छिमारांचे नेतृत्त्व करण्याची संधी तांडेल यांना लाभली असून ते परिषदेला रवाना झाले आहेत. Ramakrishna Tandel will lead the fishermen

ही परिषद १४ सप्टेंबरपर्यंत असून जगातील वाणिज्य, व्यापार, अन्न व मत्स्य सुरक्षा आणि सहकारी विकास मंत्रालयाच्या अखत्यारित होणार आहे. या फोरममध्ये जगभरातील शेतकरी नेते, मच्छिमार नेते, अन्न सार्वभौमत्वाचे पुरस्कर्ते, नागरी समाजातील कार्यकर्ते आणि धोरण निर्माते सहभागी होणार आहेत. टिकाऊ शेती, कृषी-मत्स्यव्यवसाय पर्यावरणशास्त्र, उत्पादक सहकारी संस्था आणि अन्न उत्पादकांचे हक्क या महत्त्वाच्या विषयांवर संवाद, सहकार्य व धोरणात्मक नियोजन यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ ठरणार आहे. Ramakrishna Tandel will lead the fishermen

नॅशनल फिशर्वकर्स फोरम ही आशिया खंडातील मच्छिमारांचे नेतृत्त्व करणारी संघटना आहे. तांडले हे रायगड जिल्ह्यातील असून अनेक वर्षे ते या संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती कार्यध्यक्ष आहेत. त्यामुळे कोकणातील एका मच्छिमार नेत्याला आशिया खंडातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून नॅशनल फिशर्वकर्स फोरमच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. Ramakrishna Tandel will lead the fishermen

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRamakrishna Tandel will lead the fishermenटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.