महिला सेलबरोबर पक्ष संघटन उभे करण्याचे उद्दीष्ट
गुहागर, ता. 19 : गुहागर तालुक्यातील राजश्री घाटगे यांची लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) या पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती लोक जनशक्ती पार्टीच्या महिला सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा डॉ. वंदना जाधव यांनी केली आहे. राजश्री घाटगे तालुक्यातील महिला सबलीकरण, संघटन या क्षेत्रात सुरवातीपासूनच कार्यरत आहेत. त्यामुळे एका महिला कार्यकर्तीला जिल्हाध्यक्षा होण्याचा सन्मान मिळाल्याची प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे. Rajshree Ghatge District President of Lok Janshakti Party
गुहागर तालुक्यातील पालशेत येथे रहाणाऱ्या सौ. राजश्री घाटगे यांचे ब्युटीपार्लर आहे. व्यवसायाबरोबरच ब्युटीपार्लर प्रमाणपत्र कोर्स शिकवून अनेक तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशाच प्रकारे शिवण क्लास प्रशिक्षण वर्गांचे आयोजनही त्या करतात. महिला स्वयंरोजकार विकास प्रकल्पाच्या त्या केंद्र संचालिका आहेत. बाल विकास शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे कामही त्या करतात. समाजसेवेची आवड असणाऱ्या राजश्री घाटगेंच्या कार्याची दखल लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) या पक्षाने घेतली. Rajshree Ghatge District President of Lok Janshakti Party

आज लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) या पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान केंद्र सरकारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री आहेत. बिहारमध्ये एलजेपी सत्तेत आहे. आता संपूर्ण देशात पक्ष वाढविण्याचे धोरण पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांनी आखले आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात संघटनात्मक नियुक्तांवर भर दिला जात आहे. गुहागरमधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणासाठी धडपडणाऱ्या सौ. राजश्री घाटगे यांना जिल्हाध्यक्ष (महिला सेल) देऊन पक्षाने सन्मानित केले आहे. Rajshree Ghatge District President of Lok Janshakti Party
या पदाचा स्विकार केल्यानंतर गुहागर न्यूजशी बोलताना सौ. राजश्री घाटगे म्हणाल्या की, आमचा पक्ष वाढविण्यासाठी इथे प्रस्थापित असलेल्या पक्षांचे आव्हान आहे. तरीदेखील रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका, मंडल स्तरावरील कार्यकर्त्यांना सोबत घेवून पक्ष संघटना वाढविण्याचे उद्दीष्ट मी ठेवले आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी मोहिम, महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम आणि पक्षाच्या विविध उपक्रमांचे आयोजन आम्ही करणार आहोत. Rajshree Ghatge District President of Lok Janshakti Party
