गुहागर ता. 12 : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी श्रीमती आर. पी. पी. कनिष्ठ विद्यालय, पालशेत येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि National Centre for Science Communicators यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. Quiz competition at Palshet
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आर. पी. पी कनिष्ठ महाविद्यालय, पालशेत येथे संपन्न झाला. यावेळी NCSC चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास नाईक-साटम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले. Quiz competition at Palshet

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सिद्धी उमेश सैतावडेकर यांनी मिळवला. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे श्री. सार्थक मनीष पिलणकर आणि कु. तृप्ती उदय पालशेतकर यांनी पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक वेदांत नामदेव हळये, श्रेया विश्वास हेदवकर आणि अंतरा संदीप हळये यांना प्रदान करण्यात आली. Quiz competition at Palshet
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश दिवे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरचे प्राचार्य डॉ. अविनाश एन. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव, संशोधनवृत्ती आणि उत्कृष्टतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. Quiz competition at Palshet
