गुहागर, ता. 17 : गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये “नेमकं चाललंय काय…?”हाच प्रश्न गुहागर मधील सुज्ञ मतदारांना पडला आहे. गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवाराकडून आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. परंतु देशात व राज्यात असणारी महायुती मात्र गुहागर नगरपंचायत मध्ये या पुढील काळात दिसेल का असाही प्रश्न येथील सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. Question mark over Mahayuti in Guhagar Nagar Panchayat elections

महायुतीतील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्या आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी सुद्धा स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने एकूण १७ पैकी १४ जागांवर नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत तसेच शिवसेना शिंदे गटाने १७ पैकी ९जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी ६ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत १७ पैकी ९ ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. Question mark over Mahayuti in Guhagar Nagar Panchayat elections
मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक पदासाठी १७ पैकी १४ जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. उमेदवार अर्ज भरताना भाजप शिवसेना एकत्र जरी रॅलीमध्ये दिसून आले. तरीसुद्धा पुढील काळामध्ये एकत्र राहतील की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. तरीसुद्धा अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत महायुतीमध्ये अनेक चर्चा होऊन महायुती म्हणून गुहागर नगरपंचायत निवडणूक लढवेल का हे पाहावे लागणार आहे. Question mark over Mahayuti in Guhagar Nagar Panchayat elections
