मंत्री चव्हाण, रेल्वे स्थानकांना जोडणारे रस्ते काँक्रिटचे होणार
मुंबई, दि. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांचे सुशोभिकरण. रेल्वे स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरण. रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारणे. या तिन्ही कामांची प्रक्रिया तातडीने सुरू करा. असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. कोकण रेल्वे (Konkan Railway ) व सार्वजनिक बांधकामच्या (PWd) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत बोलत होते. मंत्री चव्हाण यांच्या निर्णयामुळे लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार आहे. PWD Minister Meeting on Konkan Railway
यावेळी रत्नागिरी – दादर पॅसेंजर (Ratnagiri Dadar Passenger) गाडी दिवा जंक्शनच्या ऐवजी दादर रेल्वे स्थानकापर्यंत (Dadar Railway Station) करण्याबाबत तसेच तुतारी एक्सप्रेसला (Tutari Express) नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी दिले. कोरोनाच्या काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वे स्थानकावरील रो-रो सुविधा (Ro-Ro facility) पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. असेही कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. PWD Minister Meeting on Konkan Railway
PWD Minister Meeting on Konkan Railway
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबूतीकरण व नुतनीकरण (strengthening and renovation of roads connecting Konkan railway station) , स्थानकांचे सुशोभिकरण (Beautification of Konkan Railway Stations) आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. PWD Minister Meeting on Konkan Railway
Beautification of Konkan Railway Stations
मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबई- कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. परंतू, या हजारो प्रवाश्यांना रेल्वे स्थानकांवर तसेच या परिसरात कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांना नेहमीच विविध हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. काही प्रमुख रेल्वे स्थानकांचा अपवाद वगळता कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके लवकर सुसज्ज करावीत. तसेच, या प्रक्रियेस विलंब न लावता येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. PWD Minister Meeting on Konkan Railway
Renovation of roads
कोकण रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. हे रस्ते क्रॉकिंटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी असून या प्रमुख रस्त्यांच्या क्रॉकिटीकरणासाठी सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कोकणवासी व मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते तयार करण्याची आमची पूर्ण तयारी असून यादृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र दिले तर रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात येईल. असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राजापूर रोड, सौंदळ, रत्नागिरी, भोके, आडवली, विलवडे, विलवडे, सावर्डा, चिपळूण, कामथे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड, आयनी, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, सिंधुदूर्गनगरी या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे लवकरात लवकर हाती घेण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. PWD Minister Meeting on Konkan Railway
Police Station on the Konkan Railway
कोकण रेल्वे मार्गावर वारंवार अनेक अपघात होतात. तसेच, दरडी कोसळण्याच्या अनेक दुर्घटनाही होतात. त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने उपाययोजना व मदत करण्याच्या दृष्टीने या परिसरात सुसुज्ज पोलिस ठाणे व पोलिस चौकीची मागणी सातत्याने रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे. परंतू, कोकण रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याबाबत मंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी व कणकवली रेल्वे स्थानकात दोन स्वतंत्र व सुसज्ज पोलिस ठाणे बनविण्यात यावीत. Two separate and well-equipped police stations at Ratnagiri and Kankavali railway stations. तसेच याच परिसरात ८ पोलिस चौकी नव्याने तयार करण्याबाबात कोकण रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने योग्य जागा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी यावेळी उपस्थित कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना दिल्या. PWD Minister Meeting on Konkan Railway
या बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे.एस.थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एन. राजभोज, एस. एन. गायकवाड, ए.ए.ओटवणेकर, ए.एम.रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे डिसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विजय केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.