• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पूर्णगडला खारवी पतसंस्थेच्या शाखेचे उद्‌घाटन

by Guhagar News
October 11, 2023
in Bharat
109 2
0
Purnagadla Kharvi Credit Institution Branch
215
SHARES
614
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पतसंस्थेची 5 वर्षातील 5 वी शाखा, नाट्यकर्मी राम सारंग यांची उपस्थिती

रत्नागिरी, ता. 11 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या ५ व्या शाखेचे पूर्णगड रूपाने ८ आँक्टोबर रोजी छानदार उद्घाटन नाट्यकर्मी राम सारंग यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. चांगले नेतृत्वच समाजव्यवस्थेला उभारी देऊन शकते हे पतसंस्थेच्या संचालकांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन राम सारंग यांनी केले. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी सुरु झालेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे या कालावधीत सहकार खात्याचा पुरस्कार मिळवला. तसेच अवघ्या 5 वर्षात 5 शाखा सुरु करुन कार्यविस्तार केला आहे. दाभोळनंतर 5वी शाखा रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे सुरू झाली. या शाखेच्या उद्‌घाटन समारंभाला नाट्यकर्मी राम सारगं, स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

Purnagadla Kharvi Credit Institution Branch

उद्‌घाटन समारंभात बोलताना पूर्णगडच्या सरपंच सौ.सुहासनी धानबा म्हणाल्या की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ. परिसरातील बंधूभगिनींना सभासद करून पतसंस्थेने त्यांना आवश्यक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

गतपाच वर्षात खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी यांची घौडदौड वाखाणण्याजोगी आहे. पाचही शाखेच्या उद्घाटन प्रसंगी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येऊन शाखेंचे उद्घाटन करणे म्हणजे सहकार मेळ्याची अनुभूती या संस्थेने दाखवून मौलिक कार्य यांच्या हातून होताना दिसत आहे. पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच पाच शाखांची निर्मिती हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उल्लेखनीय काम म्हणून खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव महाराष्ट्रात भविष्यात चिरंतन राहील. सर्व संचालक व संस्थेशी जोडलेले सर्व बंधूंभगिनींच्या साथीने उत्तम संघटक म्हणून अध्यक्ष संतोष पावरी यांनी संस्थेला उभारी देण्याचे काम केले आहे असे वक्तव्य स्वरूपानंद संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक पटवर्धन यांनी केले. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

शंकर लाकडे, अविनाश डोर्लेकर यांनी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल आहे व समाजाला पुढे नेण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आपण संस्थेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे योग्य कामासाठी वापरा व कर्जाचे हप्ते वेळेत भरून सहकार्य करा असे समाजाला आवाहन केले. प्रामाणिक, सुज्ञ व विश्वासू संचालक व काटेकोरपणे पतसंस्थेचे व्यवहार सांभाळणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या एकजूटीनमुळेच चांगले कार्य म्हणून महाराष्ट्रातील कोकण विभागातून सहकार क्षेत्रातील एक नंबरचा पुरस्कार खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मिळाला म्हणून मी सर्वांचे अभिनंदन करतो.चांगले नेतृत्वच समाजव्यवस्थेला उभारी देऊन शकते हे गत पाच वर्षाच्या कार्यावरून या पतसंस्थेच्या चालकांनी सिध्द करून दाखवले आहे. असे वक्तव्य उद्घाटक राम सारंग यांनी करून संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

संस्थेचा कारभार गतिमान राखण्यासाठी माझ्या बरोबरीने काम करणारे उपाध्यक्ष सुधीर वासावे, सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी, सर्व समन्वय समिती पदाधिकारी, सदस्य व संस्थेच्या हितचिंतकांमुळेच दिपस्तंभासाखी  उभी राहिली आहे. संस्थेचे सदस्य हे मालक म्हणून सहभागबरोबरच संस्थेला उभारी देण्याचे कार्य करीत आहेत. सभासद ही आमची पुंजी आहे यांच्या सहकार्यानेच भविष्यातील योजना राबविण्यात व त्यांच्या सन्मानाबरोबर त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहिल.असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी केले. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

संस्थेने पाच वर्षात १३ कोटींपेक्षा अधिकतेने भागभांडवल उभे करून संस्था प्रगतीपथावर जात असल्याचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगून संस्थेच्या वाटचालीची विस्तृत माहिती दिली. या उद्घाटन कार्यक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून सभासद उपस्थित राहिले होते. पूर्णगड येथील शाळा क्रं.१ मध्ये तुडुंब गर्दीने या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा पालक वासुदेव वाघे, दिनेश डोर्लेकर, मदन डोर्लेकर, कमलाकर हेदवकरसर, स्थानिक समन्वय समिती पदाधिकारी, पुर्णगड येथील ग्रामस्थ बंधूभगिंनी सहकार्याबरोबरच शाखेसाठी विविध वस्तू देणगी रूपाने दिल्या. शाखा उद्घाटन पूर्वीच शाखा सुरू करण्यासाठी १ कोटी १७ लाख ठेवी आणण्याचे काम या सर्वांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वासुदेव वाघे यांनी तर आभार प्रदर्शन मदन डोर्लेकर यांनी केले. Purnagadla Kharvi Credit Institution Branch

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPurnagadla Kharvi Credit Institution Branchटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.