गुहागर, ता. 24 : शहरातील कवी राजेंद्र आरेकर लिखित साद आईस या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी सायं. 5.00 वा. ज्ञानरश्मि वाचनालयाचे डॅा. तानाजीराव चोरगे सभागृह येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी मा. श्री. अरूण इंगवले यांच्या हस्ते होणार आहे. Publication of Poetry Book


शहरातील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांना साहीत्याची आवड आहे. गुहागर शहरात दोन साहित्य संमेलने यशस्वी करण्यामध्ये राजेंद्र आरेकर यांचा सिंहाचा वाटा होता. ज्ञानरश्मि वाचनालय आणि मराठी साहित्य परिषद शाखा गुहागर या संस्थाचे अध्यक्ष या नात्याने गुहागर शहरात साहित्य चळवळ राबविली. कवी मनाच्या राजेंद्र आरेकर यानी अनेक कविता लिहील्या आहेत. या कवितामधून कोकणचा निसर्ग त्यांची आईवर असलेली अपार श्रध्दा, जीवनातील अनेक अनुभव शब्दबध्द केले आहेत. या कवितांचे वाचन त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून केले. अनेकांनी त्यांच्या कवितांचे कौतूकही केले. अशा विविध कवितांचा संग्रह पुस्तक रूपात सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. या कविता संग्रहाचे नाव साद आईस असे आहे. Publication of Poetry Book
शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी सायं. 5.00 वा. ज्ञानरश्मि वाचनालयाचे डॅा. तानाजीराव चोरगे सभागृहात चिपळूणातील ज्येष्ठ कवी मा. श्री. अरूण इंगवले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिपळूणचे आमदार मा. श्री शेखरजी निकम आहेत. तसेच लोकमान्य टिळक स्मारकाचे कार्याध्यक्ष मा. श्री. प्रकाश देशपांडे, समिक्षक प्रा. अंजली बर्वे, कवी गीतकार श्री. राष्ट्रपाल सावंत, महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष श्री. संतोष गोणबरे या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. Publication of Poetry Book
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. Publication of Poetry Book

