प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे ; २४ रोजी सातारा येथे प्रकाशन
गुहागर, दि.19 : गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, संशोधक, कादंबरीकार प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या एक कैफियत या गझल संग्रहाचे प्रकाशन दि. २४ मार्च २०२२ रोजी सायं. ५.३० वा. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सातारा येथे श्री समर्थ सदन, राजवाडा, सातारा येथे होणार आहे. Publication of Ghazal Collection


डॉ. लबडे यांची या पुर्वी बारा पुस्तके प्रकाशित आहेत. महाद्वार ..मुंबई बंबई बाँम्बे…नंतर हा तिसरा कविता संग्रह गझलेच्या रूपाने प्रसिद्ध समीक्षक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्या बरोबरच प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर (पुणे) ह्यांच्या अविनाशपासष्टी (ग्रंथाली, मुंबई ) ह्या गझल संग्रहावर चर्चा होणार आहे. Publication of Ghazal Collection
अविनाशी गझल (अविनाश सांगोलेकरांच्या चार गझलांचे गायन ) गायक- प्रा. संभाजी पाटील (सातारा), डॉ. श्रीपाल सबनीस ( ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक, पुणे ) – प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे ( ऑडिटर, रयत शिक्षण संस्था, सातारा ), प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के (ज्येष्ठ लेखक व समीक्षक, सातारा ) प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर ( आद्य मराठी गझल संशोधक आणि ज्येष्ठ गझलकार, पुणे ) मा . विनोद कुलकर्णी (विश्वस्त , अ . भा . मराठी साहित्य महामंडळ ) शिरीष चिटणीस (पुणे शहर प्रतिनिधी, म.सा.प., पुणे ), शाहीर शाहिद खैस्टकर, दि. बा. पाटील ( ज्येष्ठ साहित्यिक, सांगली ) Publication of Ghazal Collection
सूत्रसंचालन – डॉ. धबंजय भिसे ( संस्थापक अध्यक्ष, मातंग साहित्य परिषद , पुणे ) करणार आहेत. स्वागतोत्सुक – विनायक भोसले व्यवस्थापक – दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सर्व संचालक मंडळ स्टाफ व सर्व सहकारी हे आहेत. Publication of Ghazal Collection

