लेखिका प्रा. मनाली बावधनकर, महिलांच्या संघर्षावरील कथा
गुहागर, ता. 21 : शहरातील प्रा. सौ. मनाली बावधनकरांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, 22 मे रोजी साताऱ्यात होत आहे. या कथासंग्रहाचे नाव बाईपणाच्या उंबरठ्यावर असे आहे. 14 पुस्तकांचे लेख, 8 पुरस्कारप्राप्त, सातारा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. Publication of Book in Satara


आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या स्त्रीला पत्नीत्व, मातृत्व, नाती गोती, रूढी परंपरा, जपताना संघर्ष करावा लागतो. या संघषार्च वर्णन विविध कथांच्या नायिकांद्वारे सौ. मनाली बावधनकर यांनी बाईपणाच्या उंबरठ्यावर या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सौ. बावधनकर यांच्या माहेरी साताऱ्याला श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय येथे रविवारी, 22 मे रोजी होत आहे. मराठी साहित्य परिषद शाखा गुहागर, ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर आणि क्रांतिसुर्य ग्रुप सातारा यांच्या वतीने हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. यशवंत पाटणे, प्रमुख पाहुण्या साहित्यिका नीलम माणगावे, समाज कल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, ज्येष्ठ कवी राजेंद्र आरेकर, राष्ट्रपाल सावंत, प्रा. संतोष गोणबरे उपस्थित रहाणार आहेत. Publication of Book in Satara


प्रा. सौ. मनाली बावधनकर यांच्या विविध विषयांवरील ललित लेखांचा संग्रह असलेले ओघळेले मोती या पुस्तकाचे प्रकाशन नोव्हेंबर 2021 ला गुहागरमध्ये झाले होते. अवघ्या 4 महिन्यांनी एप्रिल 2022 मध्ये ओघळेले मोती पुस्तकाला लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर, चिपळूणने कवी आनंद पुरस्कार देवून गौरविले होते. त्यानंतर आज त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन साताऱ्यात होणार आहे. याबद्दल गुहागर, चिपळूणमधील साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी सौ. मनाली बावधनकर यांचे अभिनंदन केले आहे. Publication of Book in Satara
संबंधित व्हिडिओ : ओघळेले मोती पुस्तकाचा प्रकाशन सोहळा