सामाजिक व मन: स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही; रमाताई जोग
रत्नागिरी, ता. 29 : धावपळीच्या आजच्या जीवनात समाजाचे मनःस्वास्थ्य हरवले आहे. ते टिकवण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. योगगुरू रामदेवबाबा यांनी संपूर्ण भारतभर सुरू केलेल्या योगाभ्यासाची आता चळवळ झाली आहे. गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय. संपूर्ण जगाला योगाभ्यासाचे महत्त्व कळले आहे. प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करावा, असे आवाहन पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग यांनी केले. Publication of Agashe’s Mantra Arogya book

योगशिक्षक, योगसाधक अनंत आगाशे लिखित पुस्तक मंत्र आरोग्याचा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. साळवी स्टॉप- नाचणे येथील ॐ साई सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर बी.ए. योगशास्त्र सुवर्णपदक प्राप्त तथा पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने, सह योगशिक्षिका सौ. पौर्णिमा दाते, लेखक अनंत आगाशे व सत्वश्री प्रकाशनचे प्रमोद कोनकर उपस्थित होते. Publication of Agashe’s Mantra Arogya book

प्रास्ताविकामध्ये अनंत आगाशे यांनी सांगितले की, ईश्वराने मनुष्याला शंभर वर्षांचे आयुष्य दिले आहे आणि आजच्या भाषेत सांगायचे, तर योग ही शतायुषी जगण्याची गॅरंटी आणि वॉरंटी आहे. २००८ पासून साळवी स्टॉप योग शिकलो. अनेक शिबिरे सुरू केली. निःशुल्क योग शिकवत आहे. सुरवातीला प्रतिसाद कमी होता. परंतु अव्याहतपणे जवळपास १७ वर्षे येथे योगकक्षा सुरू आहे. ॐ साई सांस्कृतिक भवनही तेव्हा बांधले नव्हते. वैयक्तिक आयुष्यात योग, प्राणायामामुळे खूप फायदा झाला. हजारो लोक येथे योग शिकून गेले आहेत. सुरवातीला पौर्णिमाताई दाते येथे योग, प्राणायाम शिकवत होत्या. जास्तीत जास्त लोकांना योगाची माहिती देण्याकरिता पुस्तक लिहिण्याचे ठरवले. २०१६ ला सुरवात केली, मध्ये थोडा खंड पडला, कोरोनामुळे काम थांबले, परंतु नवनवीन माहिती सोप्या पद्धतीने मांडली आहे. यासाठी योग शिक्षक मिलिंद सरदेसाई यांचीही मोलाची मदत झाली. दररोज या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्य नमस्कार याचा सराव करावा व निरोगी राहावे. तसेच सत्वश्री प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले. Publication of Agashe’s Mantra Arogya book

योगाभ्यासासाठी संदर्भपुस्तक म्हणून असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे, असे सत्त्वश्री प्रकाशनाचे प्रमोद कोनकर यांनी सांगितले. ‘योग या विषयावरची आणखी पुस्तके श्री. आगाशे यांनी साध्या-सोप्या भाषेत लिहावीत,’ अशा शब्दांत योगशास्त्र विषयात सुवर्णपदकासह बीए पदवी प्राप्त केलेले पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने यांनी श्री. आगाशे यांना शुभेच्छा दिल्या. सह योगशिक्षिका सौ. पौर्णिमा दाते यांनीही योगवर्गाच्या वाटचालीचा आढावा घेतला. Publication of Agashe’s Mantra Arogya book
कार्यक्रमात योग शिक्षक विनय साने, सौ. पौर्णिमा दाते यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावरील सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. चित्रे रेखाटणारे चित्रकार विश्वेश टिकेकर, अमोल शिवलकर, मुखपृष्ठ साकारणारे महेश पाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे अनंत आगाशे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन समीर भाटवडेकर यांनी केले. सुनिता सावंत यांनी आभार मानले. Publication of Agashe’s Mantra Arogya book