रत्नागिरी, ता. 06 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. पावसाळ्यात हे रस्ते आणखी खराब होण्याची खूपच शक्यता आहे. परिणामी या खराब रस्त्यामुळे एसटी वाहतूक बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Public demand for repair of roads

रत्नागिरी जिल्ह्यातील खराब झालेले रस्ते
रत्नागिरी तालुक्यातील २४ ते २५ रस्ते. राजापूर तालुक्यामध्ये २८ रस्ते. चिपळूण तालुक्यात १५ ते २० रस्ते. लांजा तालुक्यातील २७ रस्ते. गुहागर तालुक्यातील ८ ते १० रस्ते. खेड तालुक्यात १५-१६ रस्ते. मंडणगड तालुक्यातील ५ ते ६ रस्ते. दापोली तालुक्यातील १२-१३ रस्ते. देवरुख तालुक्यातील ८ ते ९ रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्या रत्यावरून ए़स. टी. ने येणे अत्यंत कठीण होत आहे. तरी शासनाकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. Public demand for repair of roads
