अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत
गुहागर, ता. 23 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्राथमिक मराठी शाळा तळवली आगरवाडी नं. 3 मधील विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गांनीही सहभाग घेतला. Public awareness round of Talwali School

गुहागर तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळा तळवली आगरवाडी नं 3 मधील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, माझा तिरंगा माझ्या मनाचा राजा, माझे घर माझी शान माझा तिरंगा माझा अभिमान अशा स्वातंत्र्यावर आधारीत घोषणा दिल्या. व तळवली हॉस्पिटल स्टॉपपर्यंत जनजागृती फेरी काढली. यावेळी गावातील नागरीकांनी स्वयंप्रेरणेने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. Public awareness round of Talwali School

या जनजागृती फेरी वेळी सरपंच मयुरी शिगवण, ग्रा पं.सदस्य संतोष जोशी, मुख्याध्यापक प्रकाश गोरे, शिक्षिका सौ.कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील खोकरे, ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण, पत्रकार आशिष कारेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सांगळे, संजय गिजबले, स्वप्निल शिगवण, संतोष जाधव तसेच पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. Public awareness round of Talwali School
