जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे विविध उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे, कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्र मांडवकर गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक उमेश खैरे यांच्या प्रयत्नातून गुहागर येथील पालपेणे कुंभारवाडी येथे जिजाऊ, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था विविध उपक्रम जनजागृतीपर बैठक उत्साहात संपन्न झाली. Public awareness meeting at Palpene

या बैठकीत जिजाऊ संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. श्री. भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल रत्नागिरी येथे चालू असलेल्या हॉस्पिटल मधील विविध सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. गुहागर येथे चालू असलेल्या पोलीस अकॅडमी भरती प्रशिक्षण केंद्र लायब्ररी यांची माहिती देण्यात आली. तसेच पुढील काळात आपल्या तालुक्यात महिलांसाठी चालू करण्यात येणारे विविध उपक्रम त्यामध्ये शिलाई मशीन, मेहंदी कोर्स, कॉम्प्युटर क्लासेस गोरगरिबांचे आधारस्तंभ श्री. निलेशजी भगवान सांबरे यांच्या स्व खर्चातून मोफत पुरवल्या जातात. Public awareness meeting at Palpene
यावेळी पालपेणे कुंभारवाडी येथे चैतन्य सांप्रदाय भजन विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नथुराम हर्चीलकर, चंद्रकांत पालकर, जनसेवा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष महेंद्र मांडवकर, जन विकास कमिटी सचिव निलेश टाणकर, परशुराम नांदगावकर, श्रीधर गमरे बापू संसारे अमित खांडेकर गीते पडवेकर यांच्यासह गावातील 11 वाड्यातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ ग्रामस्थ, महिला, बंधू भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ संस्थेचे सदस्य अनंत डिंगणकर, ओंकार तिवरेकर, संजय गुप्ते या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांचा समाजसेवक उमेश खैरे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांना धन्यवाद दिले. Public awareness meeting at Palpene
