• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शासकीय इमारतीत बचत गटांना जागा देणार

by Guhagar News
May 18, 2022
in Bharat
17 0
0
Provide space in Govt. Building for SHG
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव; स्वामिनी प्रभाग संघाची सभा संपन्न

गुहागर, ता. 18 : नव्याने होणाऱ्या शासकीय इमारतीमध्ये बचत गटांच्या उत्पादित मालाला विक्रीसाठी गाळा व्यवस्था करण्यात यावी, असा निर्णय राज्य सरकारला घ्यायला लावेन.  असे प्रतिपादन  आमदार भास्कर जाधव यांनी बचत गटाच्या कार्यक्रमात केले. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती गुहागर अंतर्गत स्वामिनी महिला प्रभाग संघ, पालशेत यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यासभेसाठी प्रमुख पाहूणे आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. Provide space  in Govt. Building for SHG

Cataract Screening camp at Guhagar

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना भास्कर जाधव म्हणाले की, महिला बचत गटातून (self-help groups – SHG) महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. उत्पादित माल विक्री करण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यासाठी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करेन, बचत गटांसाठी नव्याने होणाऱ्या शासकीय इमारतीमध्ये बचत गटांच्या उत्पादित मालाला विक्रीसाठी गाळा व्यवस्था करण्यात यावी, असा निर्णय राज्य सरकारला घ्यायला लावेन. कोरोना काळात कोकणातील महिला बचत गटांनी (Women’s self-help groups)  कोणतीही थकबाकी ठेवलेली नाही. त्यामुळे थकबाकी न ठेवणाऱ्या  बचत गटांसाठी शासनाने विशेष योजना जाहिर करावी अशी विनंती राज्य सरकारला करेन. असे आमदार जाधव यांनी सांगितले. Provide space  in Govt. Building for SHG

2005 पासून सरकारने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली त्यावेळी असगोली येथील बचत गटाने गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वी करून पुरस्कार प्राप्त केला होता. त्यानंतरच्या काळात बचत गटांच्या कामगिरीची माहिती नव्हती. परंतू, याबाबत संपूर्ण माहिती प्रभाग संघाच्या माध्यमातून घेऊन महिलांसाठी मदत करण्याचे ठरवले. महिला बचत गटाने उत्पादित केलेले उत्पादन (Product produced by Women’s SHG) यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जिथे आठवडा बाजार भरतो तिथे मोक्याची जागा आरक्षित ठेवणे गरजेचे आहे यासाठी मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे विशेष बैठक घेण्याची सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. Provide space  in Govt. Building for SHG

यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या समृद्धी प्रभाग संघ वेळंब, नवज्योत प्रभाग संघ अडुर, सालबाई समुह गट पाटपन्हाळे, दत्तप्रसाद समूहगट मुंडर, लक्ष्मिकृपा समूहगट पालशेत, उत्कृष्ट उद्योजिका म्हणून सुलभा पवार, रवीना अडूरकर, प्रज्ञा शितप, चेतना दणदणे, राधिका कदम आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ईशा जानवलकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार राधिका कदम यांनी केले. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अमोल भोसले पालशेत प्रभाग संघ अध्यक्ष मनीषा जाधव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार, पंचायत समिती सदस्य सुनील पवार, पांडुरंग कापले, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, साबीर साले, संजना पवार, नेहा रावणंग, दूर्वा ओक, साक्षी पवार आदी उपस्थित होते. Provide space  in Govt. Building for SHG

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarProduct produced by Women's SHGself-help groupsSHGWomen's self-help groupsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.