सुपारी बागायतदारांची मागणी, लागवडीस अनेकजण उत्सुक
गुहागर, ता. 23 : सुपारी लागवडीसाठी गुहागर तालुक्यातील अनेक शेतकरी उत्सुक आहेत. मात्र वादळ वाऱ्यातही टिकेल, कमी कालावधीत उत्पन्न मिळेल अशी विठ्ठल प्रजातीची रोपे आज रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. शासनाच्या कृषी विभागाने, दापोली कृषी विद्यापीठाने ही रोपे उपलब्ध करुन द्यावीत. अशी मागणी बागायदारांनी केली आहे. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal


कोकणातील नगदी उत्पन्न म्हणून सुपारी लागवड क्षेत्र वाढविण्यास किनारपट्टीवरील अनेक बागायतदार उत्सुक आहेत. मात्र कर्नाटक राज्यात ठेंगणी जात म्हणून विकसीत केलेल्या विठ्ठल प्रजातीची रोपे उपलब्ध होत नाहीत. अशी खंत बागायतदारांनी बोलून दाखवली.
विठ्ठल प्रजातीच्या रोपांचे वैशिष्ट्य म्हणजे ती जास्तीत जास्त 5 ते 6 फुट उंच वाढतात. त्यामुळे सुपारी काढणे, औषध फवारणी सहज शक्य आहे. 3 वर्षांनी उत्पन्न मिळू लागते. झाडांची उंची कमी असल्याने वादळात झाडे मोडत नाहीत. शिवाय वानर, माकडे यांच्या त्रासापासून पिकसंरक्षण सहज शक्य आहे. या जातीचे आयुष्य अवघे 22 ते 25 वर्ष असते. ही एकमेव तोट्याची बाजु आहे. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal


गुहागर वरचापाट येथील ॲड. अद्वैत खरे यांनी सांगितले की, आम्ही प्रयोग म्हणून आसाममधुन कमी उंचीची 50 सुपारीचे रोपांची 6 महिन्यांपूर्वी लागवड केली. तेथील नर्सरीमालकाने रेल्वेने सर्व रोपे चिपळूण पर्यंत पाठवली. प्रवासामुळे रोपांची स्थिती खूप नाजुक होती. पुढील आठवडाभराचा कालावधी या रोपांना ताजेतवाने करण्यात गेला. सुदैवाने सर्व रोपे जगली. परंतू आसामच्या नर्सरीतून गुहागर पर्यंत रोपे आणण्यासाठी प्रत्येक रोपाला सुमारे 200 रु. खर्च आला. सर्वसामान्य शेतकऱ्याला अशा पध्दतीने रोपे आणणे सहजशक्य नाही. व्यवहार्य ठरणार नाही. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal


गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे 5 एकर जागेत कृषी लागवड करणार सागर सोहनी म्हणाले की, जिल्ह्यात फक्त हरचेरीमधील एकाच नर्सरीमध्ये ही रोपे उपलब्ध आहेत. मात्र तेथील शेतकरी म्हणून विकत घेण्यास परवडणार नाही. त्यामुळे आम्ही नाईलाजाने एक एकरात स्थानिक सुपारीची लागवड केली. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal
कृषी अभ्यासक मिलिंद गाडगीळ म्हणाले की, परप्रांतातून झाडे विकत घेताना ती कृषी प्रयोगशाळेत विलगीकरणात ठेवावी लागतात. तेथे त्यांच्यावर औषध फवारणी केली जाते. परप्रांतातील वनस्पती रोगांचा प्रसार होवू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. मात्र ही व्यवस्था जिल्ह्यात केवळ कृषी विद्यापीठच उपलब्ध करुन देवू शकते. त्यामुळे शासन आणि विद्यापीठाने विठ्ठल जातीची रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal