नगरसेविका स्नेहल रेवाळे यांचे प्रयत्न ; भूमिपूजन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या हस्ते
गुहागर, ता.15 : नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. 15 मधील नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे 9 लाख 16 हजार 113 रुपयांची संरक्षक भिंत मंजूर करून घेतली. मंजूर झालेल्या गोविंद साटले घर ते आवारापर्यंत रस्ता रुंदीकरण करणे. या सरंक्षक भिंत बांधणे कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor Rajesh Bendal) यांच्या हस्ते करण्यात आले. Protective Wall work in Janglewadi
जांगळेवाडी येथून तांबडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी मोठी दरड असून पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने सर्व दगड माती रस्त्यावर येत असते. वरील बाजूस घरेही आहेत. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी प्रभागाच्या नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार रेवाळे यांनी आपल्या माध्यमातून गोविंदा साटले घर ते आवारा परिसरापर्यंत सुमारे 9 लाख 16 हजार 113 रुपयांची संरक्षक भिंत मंजूर करून घेतली. या भूमिपूजन प्रसंगी ग्रामस्थांनी नगरसेविका स्नेहल रेवाळे यांचे आभार मानले. Protective Wall work in Janglewadi
या भूमिपूजन प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रणिता साटले, शिक्षण समिती सभापती सुजाता बागकर, नगरसेवक माधव साटले, आशिष खांबे, श्रीधर बागकर, गणपत जांगळी, नामदेव रामाणे, नरेश धनावडे, वसंत रेवाळे, अरूण जोशी, सुनिल रेवाळे, वैभव पाडावे आदिंसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. Protective Wall work in Janglewadi