• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 August 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल येथे आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम

by Manoj Bavdhankar
July 5, 2025
in Guhagar
113 1
0
Program on Ashadhi Ekadashi at Anjanvel
222
SHARES
635
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बनले हजारो भाविकांचे श्रद्धास्थान

गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील अंजनवेल येथील प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी निमित्त रविवार दिनांक ६ जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Program on Ashadhi Ekadashi at Anjanvel

निसर्गरम्य व शिवकालीन इतिहास असलेल्या अंजनवेल गावात सन १८६५ साली गावातील तत्कालीन वैश्य समाजाच्या प्रतिष्ठीत मंडळींनी व समस्त ग्रामस्थांनी श्री विठू माऊलीचा गजर करीत एकत्र येऊन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी केली. नित्य नियमाने मंदिरात पुजा सुरु झाली. हळुहळु सर्व समाजातील ग्रामस्थांची पाऊले मंदिराकडे वळू लागली. सुरवातीला चार-पाच जणांच्या आवाजात घुमणारा विठू माऊलीचा गजर शंभर जणांच्या समुह गायनाने घुमु लागला आणि बघता बघता साऱ्या पंचकोशीत मंदिराची ख्याती वाढू लागली. वेलदूर नवानगर आणि संपूर्ण गुहागर तालुक्यातील भाविक आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भागवताची पताका खांद्यावर घेऊन दिंडी नाचवत मंदिरात विठू माऊलीच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि अल्पावधीतच आपले मंदिर प्रति पंढरपूर या नावाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. Program on Ashadhi Ekadashi at Anjanvel

सन १८८० साली महाभंकर प्लेगच्या साथीने अंजनवेल गावाला विळखा घातला होता. अनेकांचे प्राण गेले, लहान मुलेही यातुन वाचली नाहीत. अनेक उपाय झाले, वैद्यकीय मार्गाचाही उपयोग होईना तेव्हा सर्व समाजातील लोक एकत्र आले आणि त्यांनी विठू रायाला साकडे घातले “हे परमेश्वरा सर्वांचे रक्षण कर, कल्याण कर, भल कर, सर्वांना निरोगी ठेव” आणि चमत्कार झाला. साथीचे थैमान आटोक्यात आले सर्व गाव भयमुक्त झाले. चिंतामुक्त झालेल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्यामुळे सर्व घरातील ग्रामस्थांनी आषाढ महिन्यातील पंचमीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु केला आणि तिच प्रथा आजमिती पर्यंत अखंडपणे त्याच उत्साहात… ! त्याच जल्लोषात…! सुरू आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विविध भक्तीमय कार्यक्रम साजरे होतात. दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती होते व त्यानंतरच हरिनाम सप्ताहाची समाप्ती होते. संपूर्ण गावासाठी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी महाप्रसाद केला जातो. Program on Ashadhi Ekadashi at Anjanvel

सन १८६५ ते सन २०१९ या कालावधीत वैश्य समाजाचे जे-जे मान्यवर, विश्वस्त, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट ला लाभले त्यांनी यथाशक्ती, यथाज्ञानाने मंदिराची उभारणी करुन प्रथम पासून असलेल्या जुन्या लाकडाच्या चौकटीचे बांधकाम यथायोग्य सांभाळून वेळोवेळी त्यात सुधारणा देखिल केली. परंतु या मंदिरावरती कळस असावा व त्याला मंदिराचे स्वरुप असावे ही खंत विश्वस्तांप्रमाणेच  सर्व श्री विठू रायाच्या भक्तांच्या मनात कायम राहिली. मंदिराची ख्याती व त्यामुळे वाढत चाललेली भक्तांची गर्दी यामुळे मंदिराच्या गार्भाऱ्यात व सभा मंडपाची जागा अपूरी पडू लागली. या सर्व गोष्टींचा विचार करुन मंदिराची नव्याने उभारणी करण्याचा संकल्प विश्वस्त आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जाहीर केला. या संकल्पासाठी अंदाजे कमीत-कमी ३० ते ३५ लाख खर्च अपेक्षीत होते आणि तो संकलीत करण्याचा निर्धार समस्त गावकऱ्यांनी व मुंबईस्थित समस्त अंजनवेलकरांनी केला आणि तो सन २०२४ साली पूर्ण होऊन देखणे मंदिर उभारण्यात आले. यावर्षी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध भक्तीमय कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. Program on Ashadhi Ekadashi at Anjanvel

विविधतेने नटलेल्या अंजनवेल गावात कातळवाडीवर विराजमान असलेली ग्रामदेवता श्री उत्राज काळेश्वरी, श्री उद्दालकेश्वर (टाळकेश्वर), श्री वेणूगोपाळ गणपती मंदिर, श्री क्षेत्रपाल मंदिर (ब्राह्मणवाडी), श्रीकृष्ण मंदिर (मराठवाडी), श्री खेत्रपाल मंदिर (सालवाडी), श्री दत्तमंदिर (गोंधळवाडी), श्री पांढरदेवी मंदिर (भोईवाडी) ,  श्री सती मंदिर (सुतारवाडी), श्री हनुमान मंदिर (सोनार वाडी) हि मंदिरे त्या-त्या समाजाची शक्तिपीठे म्हणून डौलाने उभी आहेत. सर्व अबालवृद्धांचा आशिर्वाद व तरुणांच्या एकसंगतीने त्यांचे हे वैभव उभे राहिले आहे. हिच संघशक्ती आणि अबालवृद्धांचा आशिर्वाद सन १८६५ साली उभे राहिलेले श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आज देखणे स्वरूपात निर्माण झाले आहे. Program on Ashadhi Ekadashi at Anjanvel

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarProgram on Ashadhi Ekadashi at Anjanvelटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share89SendTweet56
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.