जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर
गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने दि. 20 जुलै रोजी लांजा येथे युवा आघाडी कार्याध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ट्टे यांच्या हॅप्पी पंजाबी ढाब्या शेजारी गेट-टुगेदर, रबरी क्रिकेट बॉल स्पर्धा, जिल्हा युवा आघाडीने तयार केलेल्या वह्यांचे प्रकाशन व वृक्षारोपण समारंभ असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर यांनी रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने घेण्यात येणारे सर्व उपक्रम हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. व संत गोरोबाकाका यांची महती युवकांसमोर स्पष्ट केली. Program by Kumbar Samaj Yuva Aghadi

यावेळी श्री मिलिंद इवलेकर यांनी जिल्हा युवा आघाडीचे काम अभिनंदननीय असल्याचे नमूद केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रबरी क्रिकेट बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 6 संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम चिपळूण तालुका युवा आघाडी, द्वितीय गुहागर तालुका युवा आघाडी व तृतीय क्रमांक समान करी लांजा तालुका युवा आघाडीने यांनी मिळवला. बेस्ट बॉलर राज (गुहागर ), बेस्ट बॅट्समन बंड्या (चिपळूण), व मालिकावीर म्हणून सुधीर माखजनकर (गुहागर) यांनी पटकावले. स्पर्धांचे समालोचन श्री विक्रांत टेरवकर यांनी केले. Program by Kumbar Samaj Yuva Aghadi

क्रिकेट स्पर्धेनंतर लांजा कुंभारवाडी येथे मान्यवरांच्या शुभहस्ते विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडी कार्याध्यक्ष व लांजा तालुका युवा आघाडी अध्यक्ष श्री पंढरीनाथ मायशेटट्टे यांनी केले . Program by Kumbar Samaj Yuva Aghadi
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद ईवलेकर, लांजा तालुका अध्यक्ष संतोष तुळसणकर, खेड तालुकाध्यक्ष अनंत पालकर, पोलीस अधिकारी श्री गिरकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री विजय निवळकर, श्री उमेश जी खैर आदी मान्यवर उपस्थित होते. Program by Kumbar Samaj Yuva Aghadi

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष महेश पडवेकर, जिल्हा युवा आघाडी सचिव सुधीर जामसुतकर, जिल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष योगेश गुहागरकर, जिल्हा संघटक श्री नाना पालकर, जिल्हा संघटक श्री निलेश कुंभार, चिपळूण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष श्री अनिल पडवेकर, जिल्हा युवा जिल्हा आघाडी पदाधिकारी अमित बुरंबाडकर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश कुंभार यांनी केले. Program by Kumbar Samaj Yuva Aghadi