• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरस्वती मा. विद्यालयात बक्षिस वितरण सोहळा

by Guhagar News
February 14, 2026
in Maharashtra
31 1
0
Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya
61
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : श्री सातमाई देवी विद्याप्रसारक शिक्षण प्रसारक संस्था (पंचक्रोशी) संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय ओणनवसे प्रशालेत वार्षिक बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

आपल्या प्रशालेत प्रतिवर्षाप्रमाने शैक्षणिक वर्ष २०२५/ २०२६ .चा वार्षिक बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथम दीपप्रज्वलन व विद्येची देवता माता सरस्वतीला पुष्पमालिका अर्पण करून पुजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत गीत व ईशस्तवनाने स्वागत करण्यात आले नतंर बक्षिस वितरण करण्यात सुरुवात झाली. प्रथम मागील वर्षी आठवी ते दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तद्नंतर शालेय व सहशालेय उपक्रमात सहभागी झालेले व विजेता ठरलेले विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, व क्रीडास्पर्धा या स्पर्धांमधे यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

या कार्यक्रमास अध्यक्ष दांडेकर साहेब लाभले. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे मा. श्री प्रफुल्ल प्रकाश खडपकर साहेब (पोलीस निरीक्षक पुणे)तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचे माजी विद्यार्थी बॅच २००६ व ,२००७ यांनी शाळेला स्पिकर ( 6)व एक आहुजा कंपनीची ४२००० रु. किंमतीची स्पिकर मशीन भेट दिली.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना या माजी विद्यार्थांचे कौतूक केले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल खडपकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी व शिक्षणाचे महत्त्व तसेच शासकीय नोकरी करता शिक्षणाचे महत्त्व त्याकरता  कष्ट करण्याची जिज्ञासा बाळगावी अशा प्रकारचे बहुमोल असे मार्गदर्शन केले. Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

या कार्यक्रमासाठी उपस्थितीत संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री करबेळ साहेब, उपाध्यक्ष श्री. मिलिंदजी दांडेकर साहेब, सचिव मा.श्री वामनजी खडपकर  साहेब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटिल सर व सर्व शिक्षक  ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच अध्यक्ष श्री करबेळ साहेब यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले तसेच सचिव श्री वामनजी खडपकर साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले. नंतर अध्यक्षीय भाषणात श्री दांडेकर साहेब यांनी सुंदर मनोगत व्यक्त केले आणि अध्यक्षांच्या परवानगी  सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. Prize distribution ceremony at Saraswati Vidyalaya

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrize distribution ceremony at Saraswati Vidyalayaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.