गुहागर, ता. 09 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात नुकतेच वार्षिक बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नेहा तिवारी, उपाध्यक्ष, (H.R.), एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, मा. स्वाती दास, मुख्य व्यवस्थापक, (H.R.),एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि TWJ चे मा. श्री. सचिन पाटील, संचालक, व्यवसाय सल्लागार विभाग हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल व्ही.सावंत यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विराज महाजन यांनी केले. Prize Ceremony at Guhagar College


तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ चे अहवाल वाचन अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे (IQAC) समन्वयक प्रा. जी. बी. सानप यांनी केले. यानंतर मा.नेहा तिवारी यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी महाविद्यालयीन जीवन हे आयुष्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते आणि विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून आयुष्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असेही आवर्जून सांगितले. Prize Ceremony at Guhagar College


त्यानंतर मा. स्वाती दास यांनी आपल्या सौम्य भाषेत आपले मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थिनीची हॉलमधील उपस्थिती पाहून आनंद व्यक्त केला. समाजातील विकासात स्त्रियांचे योगदान महत्वपूर्ण असते व त्यात शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते म्हणून शिक्षणाची गंगा घरोघरी वाहायला हवी आणि त्यातूनच राष्ट्र उभारणी शक्य आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. Prize Ceremony at Guhagar College


त्यानंतर TWJ चे मा. श्री. सचिन पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थांची निसर्गाशी जवळीकता असते आणि हीच जवळीकता त्यांच्या आयुष्यातील जडण घडणीत महत्वाची भूमिका बजावत असते, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थांचा व्यासपीठावरील पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देवून सत्कार करण्यात आला. Prize Ceremony at Guhagar College
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल वि. सावंत यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायला हवा आणि शिक्षण हे आजच्या काळाची गरज आहे असेही प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजी विभागाचे प्रा.डॉ.रामेश्वर सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.पद्मनाभ सरपोतदार यांनी केले. Prize Ceremony at Guhagar College