• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 January 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्कार

by Guhagar News
January 6, 2026
in Maharashtra
120 1
0
Priyanka Gandhi gets Udyog Ratna award
235
SHARES
671
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. ११ जानेवारीला मुंबईत होणार सन्मान

गुहागर, ता. 06 : गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौभाग्यवती प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित यशोत्सव २०२६ भव्य सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुंबई परळ येथे दि. ११ जानेवारी रोजी आर.एम.एम.एस. हॉल येथे हा सोहळा होणार आहे. Priyanka Gandhi gets Udyog Ratna award

यावेळी उद्योजकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर प्रेरणादायी सत्रेही आयोजित केली असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते प्रदीप लोखंडे, संतोष सकपाळ, दीपक शिंदे, आरती बनसोडे यांचे प्रेरणादायी विचार ऐकायला मिळणार आहेत. संस्थेचे इतर विश्वस्त दीपक मेजारी, रूपाली तेलवणे, संजय भाट, चंद्रकांत खाडये, विष्णू सातवसे, मनोज आंग्रे यांचे देखील मार्गदर्शन मिळणार आहे. Priyanka Gandhi gets Udyog Ratna award

यावेळी गिरीश कोळवणकर, सौ.प्रियांका प्रमोद गांधी, सौ.रुषाली सागर मोरये, राज साडविलकर, विनय पाताडे, विनायक धडाम यांना उद्योगरत्न पुरस्काराने तर दयानंद माणगावकर, रामकृष्ण कोळवणकर यांना उद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाजातील शालीग्राम खातू, संतोष भालेकर, भाई शेटये व नवनिर्वाचित वैश्य समाजातील सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.  जगभरातील अनेक यशस्वी नामांकित उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी अजित लाड 9833037334 यांच्याकडे संपर्क साधावा. Priyanka Gandhi gets Udyog Ratna award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPriyanka Gandhi gets Udyog Ratna awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.