गुहागर, ता. 20 : तालुक्यात गुरवारी दिवसभर ढगाळ वातावरण नंतर आज शुक्रवारी पहाटे चार च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे चार ते सात वाजेपर्यंत हलक्या सरी बरसल्या. त्यानंतरही पुन्हा ढगाळ वातावरण राहिले. Presence of rain in Guhagar


मान्सूनने अंदमान बेट व्यापल्यानंतर मान्सूनची घोडदौड वेगाने सुरु आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची २१ ते २३ मे दरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून गुरवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर आज पहाटे चार ते सात हलक्या सरीही बरसल्या. यामुळे तालुका वाशियांना उन्हाचा सामना करावा लागला नाही. Presence of rain in Guhagar

