• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 March 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रणव पोळेकर यांनी घेतली पालकमंत्री यांची भेट

by Guhagar News
February 12, 2026
in Ratnagiri
280 3
0
Pranav Polekar met the Guardian Minister
551
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : कोंडकारुळ पंचायत समिती गणातून विजयी झाल्यानंतर तरुण नेतृत्व म्हणून पुढे आलेले प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी येथे जाऊन पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. Pranav Polekar met the Guardian Minister

विजयानंतर प्रथमच अधिकृतपणे पालकमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. यावेळी तालुक्यातील विकासकामे, कोंडकारुळ गणातील प्रलंबित प्रश्न तसेच आगामी पंचायत समितीच्या कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Pranav Polekar met the Guardian Minister

प्रणव पोळेकर हे कोंडकारुळ गणातून दमदार विजय मिळवत पंचायत समितीत दाखल झाले आहेत. तरुण, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांमध्ये सतत संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे लक्ष लागलेले आहे. रत्नागिरीतील या भेटीत पुढील विकास आराखड्यांबाबत मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले जात असून, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश पोळेकर यांनी दिला आहे. Pranav Polekar met the Guardian Minister

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share220SendTweet138
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.