• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार

by Guhagar News
February 13, 2026
in Ratnagiri
25 0
0
Pramod Konkar wins journalism award
49
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या शैलेश रमेश डोळस विद्यानगरीतील श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर यामहा ट्रेनिंग स्कूलमध्ये पुरस्कार वितरण झाले. संस्थेचे सचिव संतोष पडवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडला. शाळेच्या प्रांगणात ढोलताशांच्या जल्लोषात व टोयो सांस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांचे व सत्कारमूर्तींचे औक्षण  करून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात अमोल रेडीज यांनी शाळेची प्रगती व सत्कारमूर्तींची ओळख व परिचय करून दिला. Pramod Konkar wins journalism award

कृषी, कला, क्रीडा व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये गंगाधर ऊर्फ भाईसाहेब लाड जिल्हास्तरीय जीवन गौरव पुरस्कार – विजय शिवराम बेर्डे, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार – दीपक दत्ताराम नागवेकर, रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुरस्कार – शशांक उपशेट्ये, आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार – बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर, मनोहर विठोबा ऊर्फ डॅडी कोकाटे जिल्हास्तरीय उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार – अनिकेत चव्हाण, रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय कला गौरव पुरस्कार – धीरज साटविलकर, रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार – शरद वासुदेव चव्हाण, का. रा. ऊर्फ भाईसाहेब कोळवणकर जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार – जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, रमेश धोंडू डोळस आदर्श तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार – सीताराम कदम, रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श कर्मचारी पुरस्कार शशिकांत बाबल्या चव्हाण, बाळशेठ कोळवणकर आदर्श शेतकरी  पुरस्कार – सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई यांना पुरस्कार देण्यात आले सन्मानचिन्ह सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुरस्काराचे असे होते. Pramod Konkar wins journalism award

प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार अनिल गोसावी, लेखक-दिग्दर्शक सिने-नाट्यअभिनेते असित रेडीज, राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, लांज्याच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, लांज्याच्या उपनिरीक्षक सौ. देवकन्या मेंदळे,  संचालक श्रीकृष्ण सरदेसाई, सहसचिव सुरेश चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष तथा सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, संचालक रवींद्र डोळस, वेरवली बुद्रुकच्या सरपंच सौ. वेदा कोळवणकर, वेरवली खुर्दचे उपसरपंच सूरज कुरतडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पंढरी गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे व विद्यार्थी सुरक्षा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. Pramod Konkar wins journalism award

विजय बेर्डे, धीरज साटविलकर, नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, उपनिरीक्षक सौ. मेंदळे, नायब तहसीलदार अनिल गोसावी, अभिनेते असित रेडीज, सुभाष लाड, धीरट  यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संतोष पडवणकर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना अशा व्यक्तींकडून  प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.   कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक, पालक, आजी- माजी विद्यार्थी,  शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन कांबळे व विनोद बंडगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. Pramod Konkar wins journalism award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPramod Konkar wins journalism awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.