या योजनेअंतर्गत (PMFME) प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अर्ज करावेत
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच पि.एम.एफ.एम.ई. ही योजना राबविली जात आहे. यामध्ये फळे- भाज्या, धान्य, डाळी, तेलबिया, मसाले, मत्स्य, दुग्ध, लघु-वनउत्पादने यांसारख्या नाशवंत कृषि मालावरील अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते. सदरील योजनेअंतर्गत नविन प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी तसेच कार्यरत असलेल्या युनिट मध्ये विस्तारीकरण, स्तरवृद्धी व अधुनिकीकरणासाठी ही लाभ घेता येतो. Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme
सदरील योजना ही बँक कर्जाशी निगडीत असुन प्रकल्प खर्चाच्या ३५% किंवा जास्तीत जास्त १० लक्ष रू पर्यंत अनुदान देय आहे. यामध्ये आंबा, काजू , कोकम, सुपारी, फणस आदी फळ प्रक्रिया उद्योग, राईस मिल, मसाला प्रक्रिया, डाळ मिल, तेलघाणा, नाचणी प्रक्रिया, पापड, लाडू, चक्की, चटणी, पोहे, बेकरी उद्योग, दुग्ध प्रक्रिया, पशूखाद्य प्रक्रिया, मत्स्य प्रक्रिया आदी अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी करता येते. आपल्या कोकण विभागामध्ये छोटे-मोठे अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी खुप वाव असुन मार्केटिंगसाठीही चांगली संधी उपलब्ध आहे. योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी यामध्ये पुरूष किंवा महिला, शेतकरी, युवा उद्योजक तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी गट, महिला बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपण्या लाभ घेऊ शकतील. Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी कृषि विभागाकडे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार कार्ड, पॕन कार्ड, व्यवसाय करावयाच्या जागेची कागदपत्रे / संमतीपत्र/ भाडेकरार, लाईट बिल, बँक पासबूक, आवश्यक मशिनरीचे कोटेशन आदी कागदपत्रे जोडावीत. Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme
योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थींचे अर्ज आॕनलाईन करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे व कर्ज मंजुरीसाठी बँकेशी समन्वय ठेवणे यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती ( डि.आर.पी) यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, महिला/ युवा उद्योजक, शेतकरी गट, महिला बचत गट यांनी लाभा घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. आधिक माहितीसाठी नजिकचे सहाय्यक कृषि अधिकारी / उप कृषि आधिकारी / मंडळ कृषि अधिकारी / तालुका कृषि आधिकारी कार्यालय किंवा जिल्हा संसाधन व्यक्ती यांना संपर्क साधावा. Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme