रत्नागिरी दि 01 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 01 जानेवारी 2017 पासून कार्यान्वीत आहे. सदर योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची 107 टक्के उद्दिष्टपूर्ती तसेच राज्यस्तरीय कार्यमूल्यांकन क्रमवारीत माहे मे 2022 मध्ये रत्नागिरी जिल्हाने अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. Pradhan Mantri Matruvandan Yojana
योजनेचे उद्दिष्ट :-
1) माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या राष्टीने गर्भवती महिला स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
२) जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात रहावा.
३) प्रसुतीपूर्व प्रसुतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजूरी मिळावी यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यान्वीत केली आहे.


योजनेचे निकष :-
शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत (शासकिय रुग्णालये) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत एकदाच लाभ अनुज्ञेय असून, लाभाची रक्कम रु. 5000/- इतकी आहे. चैतनासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय रहाणार नाही. मात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शविल्याप्रमाणे रु. 5000/- बँक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्यात (DBT Through PFMS) व्दारे समाजातील सर्व स्तरातील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते. Pradhan Mantri Matruvandan Yojana
पहिला हप्ता – रु. 1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत शासकिय संस्थेत नोंदणी केल्यानंतर
दुसरा हप्ता – रु. 2000/- किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तथा 180 दिवस पूर्ण होणे आवश्यक
तिसरा हप्ता – रु.2000/-प्रसुतीनंतर बाळाचे 14 आठवडयापर्यंतचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात.
आवश्यक कागदपत्र :-
लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, आधार सल्बन बँक किंवा पोस्ट खाते, माता व बाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बाळाचे लसीकरण कार्ड.
सदर योजना उत्तमरितीने राबविणेसाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच आरोग्य संस्थेच्या परिसरामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, वर्तमानपत्रे व रेडियो प्रक्षेपणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा यांचा सहभाग घेण्यात येतो. सद्यस्थित रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्यसतरावरून देण्यात आलेले मातांचे 29 हजार 606 उद्दिष्टापेक्षा एकूण 31 हजार 857 मातांना एकूण रु. 13,51,98,000/- लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. जिल्हयात कोविड साथीच्या लॉकडाऊन काळातही व नागरिकांचा तसेच पात्र मातांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली. Pradhan Mantri Matruvandan Yojana