• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 January 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवी ग्राम संस्था मुंबईचे अध्यक्ष प्रदीप हळदणकर

by Guhagar News
December 30, 2025
in Guhagar
81 1
1
Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai
160
SHARES
456
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 गुहागर, ता. 30 : हेदवी ग्राम संस्था मुंबई या संस्थेची स्थापना हेदवी गावातील तत्कालीन समाज सुधारकांनी सन १९२५ साली केली. गावाचा सर्वांगीण विकास हे ध्येय मनाशी बाळगून गावामध्ये  एस. टी.बस सुविधा, पोस्ट ऑफिस, वाडीवाडीत दिवा बत्तीची सोय, पक्के रस्ते, गावात ग्राम पंचायत या बरोबरीने माध्यमिक शिक्षणाची आणि प्राथमिक आरोग्य सुविधा या महत्त्वाच्या बाबी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai

संस्थेच्या या प्रदीर्घ शतकीय वाटचालीमध्ये हेदवी गावातील प्रसिद्ध उद्योगक स्व. हेदवकर बंधू, श्री दशभुज लक्ष्मी गणेशाचे परम भक्त उद्योजक कै.शिवराम गोविंद तथा काकासाहेब जोगळेकर, मुंबईतील साईन हॉस्पिटलचे माजी डीन कै.डॉ. श्रीकृष्ण जोगळेकर, कै. डॉ. दामोदर जोगळेकर, हेदवी ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच कै.श्रीराम वासुदेव तथा रामभाऊ जोगळेकर, कै.विश्राम वणे, कै.शांताराम तांबे, कै.प्रमोद मोरे,कै. पी. एस. गुरव, कै. अशोक बाळकृष्ण भाटकर, कै. अर्जुन पांडुरंग तथा नाना हेदवकर आदी ग्रामस्थ मान्यवरांचे बहुमूल्य योगदान लाभले आहे. या व्यतिरिक्त  माजी आमदार कै. डॉ. श्रीधर नातू, हेदवी गावच्या माहेरवाशीण मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कै.डॉ. स्नेहलता ताई देशमुख, कै. मोतीराम वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले असून स्थानिक आणि मुंबईस्थित अनेक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे. Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai

आज ही संस्था मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्या निकेतन हेदवी या हायस्कूल ची व्यवस्था आणि देखभाल करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष अर्जुन पांडुरंग हेदवकर यांचे आकस्मितपणे दुःखद निधन झाल्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय सदानंद गुढेकर हे जबाबदारी सांभाळीत होते. या रिक्त पदावर शुक्रवार दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी कुणबी समाज्योन्नती संघ मुंबई, वाघे हॉल, परळ, मुंबई येथे संस्थेचे हंगामी अध्यक्ष श्री. संजय सदानंद गुढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये तरुण कार्यकर्ते श्री. प्रदीप श्रीधर हळदणकर यांची अध्यक्ष पदी बिनविरोध  निवड करण्यात आली. Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai

संस्थेचे अध्यक्ष म्हणून तरुण वयात मिळालेली जबाबदारी  उच्चशिक्षित श्री प्रदीप श्रीधर हळदणकर चांगल्या तऱ्हेने पार पडतील याची हेदवी गावातील ग्रामस्थांनी खात्री बाळगून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या सभेला संस्थेचे चिटणीस श्री.कृष्णा विश्राम वणे, खजिनदार श्री. अजय रघुनाथ चव्हाण, स्थानिक दक्षता कमिटी प्रमुख श्री अभय शेठ भाटकर, श्री .लक्ष्मण दत्ताराम मोहिते, सुरेश कृष्णा रामाणे, महादेव विश्राम वणे, डॉ. गजानन जोगळेकर, शिवप्रसाद हळदणकर, मिलिंद पाटेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPradeep HaldankarPresident of Hedvi Gram Sanstha Mumbaiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.