तर स्वीकृत नगरसेवक संतोष सांगळे व अमरदीप परचुरे
गुहागर, ता. 15 : गुहागर नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे संतोष सांगळे तर शिवसेनेचे अमरदीप परचुरे यांची निवड आज करण्यात आली. Pradeep Bendal, the Deputy Mayor of Guhagar

गुहागर नगरपंचायत मध्ये या निवडणुकीत भाजप व शिवसेना युती झाली होती. यात भाजपला नगराध्यक्षपद सोडण्यात आले होते तर शिवसेनेला उपनगराध्यक्षपद सोडण्यात आले. जनतेतून भाजपच्या नीता मालप या निवडून आल्या तर युतीचे 17 पैकी 13 नगरसेवक निवडून आले होते. आज उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. पालकमंत्री उदय सामंत यांनी उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल व स्वीकृत साठी अमरदीप परचुरे यांची नावे निवडली होती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या आदेशानुसार स्वीकृत नगरसेवक पदी संतोष सांगळे यांची निवड करण्यात आली. Pradeep Bendal, the Deputy Mayor of Guhagar

यावेळी नगराध्यक्ष सौ नीता मालप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर शहर अध्यश नरेश पवार, भाजपचे गटनेते उमेश भोसले, शार्दुल भावे, शिवसेना, शहर प्रमुख निलेश मोरे, राकेश साखरकर, शिवसेनेचे गटनेते अमोल गोयथळे, व सेना भाजप युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. Pradeep Bendal, the Deputy Mayor of Guhagar
गुहागर शहराला अभिमान वाटेल असे काम करू – उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल
भाजप सेनेचे वरिष्ठ नेते यांनी दिलेली संधी व शहरवासी ने दिलेली साथ यामुळे पुढील पाच वर्षात गुहागरला अभिमान वाटेल असेच काम सर्व नगरसेवकांच्या साथीने करू. तसेच गुहागरतील पर्यटन व्यवसाय चालना देण्यासाठी तसेच गुहागर शहरातील मूलभूत रस्ते, पाणी आरोग्य अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार असल्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रदीप पेंडल यांनी सांगितले. Pradeep Bendal, the Deputy Mayor of Guhagar
