गुहागर, ता.12 : भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम सर्वत्र सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या कन्हैया प्ले स्कुल गुहागर मधील बालगोपालांनी प्रभात फेरी काढली. आणि रक्षाबंधन सण साजरा केला. Prabhat Feri at Kanhaiya Play School

आपल्या देशात विविध जातीधर्माचे लोक रहातात. या सर्व गोष्टीचा विचार करून विविध वेशभूषा करून विद्यार्थी हर घर तिरंगा रॅली आणि रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या मनातमनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती कायम राहाव्यात, क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे. यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान हाती घेतले आहे. संपूर्ण भारतभर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कन्हैया प्ले स्कुल स्कुल मधील सर्व बालगोपाल तसेच सौ. राऊत मॅडम, सौ. शिंदेकुटे मॅडम उपस्थित होत्या. Prabhat Feri at Kanhaiya Play School

