• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

टपाल कार्यालयाचे व्यवहार २ ऑगस्टला बंद

by Guhagar News
July 30, 2025
in Guhagar
199 2
0
Post office closed on 2nd August
391
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे. याकरिता २ ऑगस्ट रोजी एक दिवस टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करण्याचे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे. Post office closed on 2nd August

येत्या ४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी डाक विभागातील दोन्ही प्रधान डाकघरे रत्नागिरी व चिपळूण आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये, शाखा डाकघरांमध्ये नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. एपीटीचा उद्देश हा सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही सेवा प्रदान करणे हा आहे. Post office closed on 2nd August

नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यासाठी प्रणाली पडताळणी व संरचना प्रक्रिया २ ऑगस्ट होणार आहे. त्या दिवशी टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करावे. टपाल सेवा २ ऑगस्ट रोजी एक बंद राहणार असली तरी भविष्यातील सेवा अनुभव अधिक सक्षम व डिजिटल होईल, अशी ग्वाही रत्नागिरी विभागाने व्यक्त केली. Post office closed on 2nd August

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPost office closed on 2nd Augustटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share156SendTweet98
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.