भाजपा शहर अध्यक्ष संगम मोरे यांचे नगरपंचायतीला निवेदन
गुहागर, ता. 09 : मोहल्ला येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे गुहागर नगर पंचायतीने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी गुहागर शहराच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. Poor Condition of public toilets in Guhagar


या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वरचापाट मोहल्ला येथे लोकांच्या आरोग्याचा विचार करून शासकीय नियोजनानुसार पाच सीटचे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. शौचालय बांधून झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीकडे नगर पंचायतीने दुर्लक्ष केले आहे. शौचालयाच्या भिंतीना तडे गेले आहेत. Poor Condition of public toilets in Guhagar


त्यामुळे शौचालयाची भिंत नागरिकांच्या अंगावर पडुन गंभीर इजा होऊ शकते. शौचालयाचे छप्पर तुटले आहे. दरवाजे तुटले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी शौचालयाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष संगम मोरे यांनी केली आहे. Poor Condition of public toilets in Guhagar


या कामाकडे भाजपच्या गुहागर शहर अध्यक्ष संगम मोरे यांनी लक्ष वेधल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबतचे निवेदन शहर अध्यक्ष संगम मोरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, कौस्तुभ गद्रे यांनी गुहागर नगरपंचायत प्रशासनाकडे दिले आहे. Poor Condition of public toilets in Guhagar

