गुहागर, ता. 28 : असगोली जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीने गावागावात राजकीय वातावरण तापले असून, खऱ्या शिमग्याआधीच निवडणुकीचा राजकीय शिमगा रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चावडी, मंदिराचा ओटा, शेताच्या बांधावर आणि चहाच्या टपरीवर एकच चर्चा सुरू आहे. यावेळी असगोलीचा कौल कोणाच्या बाजूने जाणार? महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व माजी सदस्य विक्रांत जाधव हे या लढतीत मैदानात उतरले आहेत. याच असगोली जिल्हा परिषद गटातून त्यांनी यापूर्वी नेतृत्व केले असून, जिल्हा परिषद प्रशासनातील त्यांचा अनुभव गटातील मतदारांना परिचित आहे. विकासकामे, नियोजन आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले निर्णय आजही चर्चेत आहेत. Political chaos in the Asgoli Z P constituency

विक्रांत जाधव यांचे या भागाशी असलेले नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, अनेक गावांतील स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, मच्छीमारांचे प्रश्न, पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांशी त्यांचा थेट संबंध राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा घराघरात होताना दिसत आहे. अनुभव, ओळख आणि याच गटातील नेतृत्वाचा वारसा यामुळे विक्रांत जाधव यांची उमेदवारी ही असगोली गटातील एक मजबूत बाजू मानली जात आहे. त्यांच्या प्रचारातही विकासकामांचा अनुभव आणि पुढील काळातील नियोजन यावर भर दिला जात आहे. असगोली जिल्हा परिषद गटामध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांत विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शैक्षणिक सुविधा तसेच सामाजिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक कामांना निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामविकासाला प्राधान्य देत आमदार भास्कर जाधव यांनी असगोली गटातील अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, नळपाणी योजनांचा विस्तार, सार्वजनिक इमारतींची दुरुस्ती व नव्याने उभारणी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा थेट लाभ मिळत आहे. या गोष्टीचाही विक्रांत जाधव यांना विजयी होण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. Political chaos in the Asgoli Z P constituency
