परळ प्रभादेवी मुंबई येथे २६ रोजी आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई – शाखा तालुका गुहागर संलग्न कुणबी युवक मंडळ व शाखा अंतर्गत गुहागर, तवसाळ, हेदवी व पालशेत गट यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी, एमपीएससीपरीक्षा आणि पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २६/११/२०२३ रोजी सकाळी ठीक १० ते १ या वेळेत कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, सेंट झेविअर्स स्ट्रीट,परळ, प्रभादेवी (पूर्व) येथे विनामूल्य स्वरूपात आयोजित केले आहे. Police Recruitment Guidance Camp
यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री.शांताराम कुदळे सर ( सेवानिवृत्त उपसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय महाराष्ट्र शासन, अध्यक्ष -विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई, उपाध्यक्ष, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान), पोलिस भरती मुख्य मार्गदर्शक श्री. मनीष यादव सर, श्री. वैभव धनावडे सर (स्वराज्य करिअर अकॅडमी), हे मान्यवर उपस्थित राहून मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत. तरी कुणबी समाजातील सर्वांनी बहूसंख्येने उपस्थित राहावे. आपल्याला हि परिक्षा द्यायची असो अथवा नसो पण या शिबिरात मिळणारी मौल्यवान माहिती आपण वाडी, गाव,व तालुक्यात पोहचवू शकतो. तरी स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्की काय? आपण त्याचा अभ्यास कसा करावा? त्यासाठी काय काय आवश्यक आहे. परिक्षेला लागणारी पात्रता, शिक्षणाची अट ,लेखी व तोंडी परीक्षा यांचे योग्य नियोजन कसे करावे व सरकारी नोकरी कशी पटकवायची याबद्दलचे मौलिक मार्गदर्शन या शिबिरात मिळणारी आहे. Police Recruitment Guidance Camp
तरी उपस्थित राहणा-या सर्वांनी वही व पेन आणावे असे जाहीर आवाहन कुणबी युवा गुहागर – शैक्षणिक समीती, अध्यक्ष श्री.सुनिल ठोंबरे, उपाध्यक्ष श्री.संदिप पाष्टे, श्री.चंद्रकांत निंबरे, श्री.भूपेंद्र गोणबरे, श्री.अविनाश शिगवण, सरचिटणीस श्री. सुबोध हळये, सहचिटणीस श्री.संजय काजारे, श्री.सतिश रांगळे, श्री.मंगेश बारस्कर, श्री. अजय रामाणे, खजिनदार श्री.संतोष फटकारे, अंतर्गत हिशोब तपासणीस श्री.सचिन पाष्टे यांनी केले आहे. Police Recruitment Guidance Camp