• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलिस पाटलांना लढविता येणार सहकारी निवडणुका

by Ganesh Dhanawade
June 4, 2022
in Politics
17 0
0
Police Patil to contest elections
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्य शासनाचा आदेश

मुंबई, ता. 04 :  राज्यातील पोलिसपाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार आहेत. तसे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने काढले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील २७ हजार पोलिसपाटलांना संधी मिळणार आहे. Police Patil to contest elections

महाराष्ट्रातील पोलिसपाटलांच्या मागण्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पोलिसपाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत पोलिसपाटलांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पोलिस पाटील यांना लढता येणार नाहीत. Police Patil to contest elections

Police Patil to contest elections

पोलीस पाटलांना किमान पंधरा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी, निवृत्तीची वयोमर्यादा साठ वर्षाहून ६५ वर्षे करणे, नूतनीकरण कायमचे बंद करणे, पोलीस पाटलांना अनुकंपा कायदा लागू करणे, कोरोनामध्ये मयत झालेल्या पोलीस पाटील यांच्या वारसांना ५० लाख रुपये विमा संरक्षण तात्काळ मिळावे या व अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीने गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. यात पोलिस पाटलांना सहकारी संस्थेमध्ये निवडणूक लढविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी संघटनेने वेळोवेळी प्राधान्याने केली होती. त्या मागणीला यश आले आहे. Police Patil to contest elections

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPolice Patil to contest electionsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.