• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्य राखीव दलातही 1201 सशस्त्र पोलीस शिपाई भरती

by Mayuresh Patnakar
October 28, 2022
in Maharashtra
20 0
0
राज्य राखीव दलातही 1201 सशस्त्र पोलीस शिपाई भरती
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : राज्य राखीव पोलीस बलातील SRPF सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) Armed Police या संवर्गातील 1201 रिक्त पदांची भरती प्रक्रिया Police Constable Recruitment राबविण्यात येणार आहे. या संबंधीची जाहीरात पुणे, नागपूर, दौंड, धुळे, मुंबई, सोलापूर, गोंदिया, कोल्हापूर, अकोला आणि कुसडगांव अहमदनगर येथील समादेशक, राज्य राखीव पोलीस बलाच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येई. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा https://mahasarkar.co.in/policerecruitment2022-mahait-org/ या संकेतस्थळावर उपलब्ध रहाणार आहे. Armed Police Constable Recruitment in SRPF.
सदर जाहीरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1 टक्का आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी. त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करु शकतात. परंतू खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
(सर्वांनी https://mahasarkar.co.in/policerecruitment2022-mahait-org/ या संकेतस्थळावर अर्ज भरताना पात्रता, नियम, अटी व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.)

एका उमेदवाराला एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाहीत.
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाइ या पदासाठी Armed Police Constable Recruitment in SRPF अर्ज केल्या उमेदवाराची प्रथम 100 गुणांची शारिरीक योग्यता परीक्षा घेण्यात येईल. या चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधुन संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
शारिरीक व लेखी परीक्षामध्ये नमुद केलेल्या दोन्ही निकषांच्या आधारे उमेदवारांमधुन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला झाली. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. त्यामुळे निवडसुचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. Armed Police Constable Recruitment in SRPF

Armed Police Constable Recruitment in SRPF

पुणे – 119 (खुला प्रवर्ग 57)
पुणे – 46 (खुला प्रवर्ग 20)
नागपूर – 54 (खुला प्रवर्ग 2)
दौंड – 71 (खुला प्रवर्ग 22)
धुळे – 59 (खुला प्रवर्ग 44)
दौंड – 110 (खुला प्रवर्ग 65)
मुंबई – 75 (खुला प्रवर्ग 37)
सोलापूर – 33
गोंदिया – 40 (खुला प्रवर्ग 20)
कोल्हापूर – 73 (खुला प्रवर्ग 11)
उदेगांव अकोला – 243 (खुला प्रवर्ग 90)
कुसडगांव अहमदनगर – 278 (खुला प्रवर्ग 111)

टॅग्ज : महाराष्ट्र पोलीस, Maharashtra Police, police recruitment, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, 1201 Armed Police Constable Recruitment in SRPF,

Tags: 1201 Armed Police Constable Recruitment in SRPFGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharashtra PoliceMarathi NewsNews in Guhagarpolice recruitmentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहाराष्ट्र पोलीसलोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.