गुहागर, ता. 11 : तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरी मधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाली. यावेळी त्वरित त्यांना शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. Poisoning due to eating pedha
शृंगारतळी येथील ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागे एका इमारतीत वेदांत ज्वेलरीचे मालक बळीराम साळवी रा.मळण यांनी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुंबईहून ज्वेलरीचे मटेरियल आणून काम देत होते. श्रावण महिना असल्याने एका महिलेने सकाळी ११ च्या सुमारास अय्यंगार बेकरी येथून पेढे आणले व त्यातील अर्धा – अर्धा पेढा महिलांना दिला. काही वेळाने येथील महिलांना चक्कर व उलटी होण्यास सुरुवात झाली . त्वरित यांना प्रो लाईट हॉस्पिटल शृंगारतळी येथे दाखल करण्यात आले. यामध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी, व मानसी शिगवण या महिला येथे काम करीत होत्या. या सर्व महिला राहणार तळवली मळण पालपेणे मधील आहेत. या महिलांनी श्रावणी सोमवारचा प्रसाद म्हणून अर्धा – अर्धा पेढा खाल्ला व काही वेळातच त्यांना चक्कर व उलट्या होण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सर्व महिलांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. Poisoning due to eating pedha

यावेळी आरोग्य विभागाच्या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर वाडकर यांनी त्वरित भेट दिली. तर गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या टीमने येऊन पंचनामा केला. शृंगारतळीत अनेक बेकऱ्या असून या बेकऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. अन्न व प्रशासन विभाग याकडे डोळेझाक का करते? असं जनतेतून बोलले जात आहे. Poisoning due to eating pedha