गुहागर, ता. 28 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी, युवाशक्ती विभाग यांच्यावतीने खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वांग्मय मंडळ यांच्या वतीने ‘श्रावणधारा’ या विषयावर स्वलिखित कविता वाचन स्पर्धा जूनियर व सीनियर महाविद्यालयीन स्तरावर उत्साहात पार पडली. या काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मेडल प्रधान करण्यात आले. तर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Poetry recitation competition at Khare-Dhere-Bhosale College
यानिमित्ताने मान्यवर कवींच्या एकापेक्षा एक कवितांनी पावसाचा एक माहोल तयार केला. श्रावणातील पावसाचे वेगळेपण या कवितांमधून व्यक्त झाले. कोमसाप गुहागर शाखेचे सचिव श्री हलगरे यांनी आपल्या “श्रावण” कवितेमधून श्रावणातील मनमोहक बदलांचे वर्णन त्यांच्या कवितेतून केले. तसेच कवी श्री मोहन पाटील यांनी देखील कवितेच्या निर्मितीबाबत माहिती देत आपल्या कोळी भाषेतल्या पाऊस नसेल तर. या कवितेचे वाचन केले. त्यानंतर युवाशक्तीचे कोकण प्रदेश अध्यक्ष अरुण मोर्ये यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आला श्रावण बाई ग काव्याचं वाचन केले. यानंतर प्रा. डॉ.बाळासाहेब लबडे सर यांनी आपल्या बालकवीतेचे कवितेचे वाचन केले. Poetry recitation competition at Khare-Dhere-Bhosale College

या काव्य वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमार यश धोंडू म्हसकर, व्दितीय क्रमांक कुमारी दिक्षा रांजाणे, तृतीय क्रमांक कुमार कैलास संदिप रजपूत तसेच उत्तेजनार्थ क्रमांक कुमार सुरज दशरथ पवार यांनी पटकावला. तसेच या कविसंमेलनात सहभागी झालेल्या गुहागर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थींनी कुमारी श्रावणी महेश साळवी आणि कुमारी श्रावणी महेंद्र जांगळी यांनी सुद्धा त्यांच्या कवितांचे वाचन केले. या सगळ्या विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समृद्धी घडवले आणि कुमारी अनिशा कानसरे या विद्यार्थींनींनी केले. Poetry recitation competition at Khare-Dhere-Bhosale College
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य महाजन, महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती विभागाचे अध्यक्ष श्री. अरुण मौर्य, गुहागर को. म. सा. प. चे सदस्य श्री. मोहन पाटील, कवी श्री. ईश्वर हलगरे, महाविद्यालयाचे प्रा. डॉ.आनंद कांबळे, प्रा. भालेराव, प्रा.डॉ.आर.एस. सोळंके, प्रा. एस. व्ही. नागेश, प्रा. व्ही. टी. शिंगे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. कैलास संदिप रजपूत याने उपस्थित सगळ्या साहित्यिक मंडळी आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची समाप्ती झाली. Poetry recitation competition at Khare-Dhere-Bhosale College