तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत.
एका वर्षात 365 दिवस असतात.
1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला 4 ने गुणल्यास 91×4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365. एक वर्षाचे दिवस होतात.
एका वर्षात 52 आठवडे असतात. पत्ते सुद्धा 52 असतात.
One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten, Jack, Queen, King यातील अक्षरांची संख्या मोजा ती येते 52.
एका वर्षात चार हंगाम असतात (Winter हिवाळा, Spring वसंत, Summer उन्हाळा, Autumn शरद).
पत्त्यात सुद्धा 4 सुट (इस्पिक, बदाम, किलवर, चौकट) असतात.
प्रत्येक हंगामात 13 आठवडे असतात. प्रत्येक सूट मध्ये 13 पत्ते असतात (1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 गुलाम, 12राणी, 13 बादशाह)
वर्षात 12 महिने असतात. पत्त्यात 12 चित्रांचे पत्ते असतात.(गुलाम, राणी, बादशाह)

आणखी थोडे गमतीशीर
लाल पत्ते दिवस, तर काळे पत्ते रात्र दर्शवितात.
इस्पिक – नांगरणी /कर्तव्य दर्शविते.
बदाम – पीक /प्रेम दर्शविते.
कीलवर – भरभराट /वाढ दर्शविते.
चौकट – पीक काढणे /संपत्ती दर्शविते.
कधी कधी 2 जोकर असतात ते लीप वर्ष दर्शवितात.
पत्ते हा फक्त खेळ नसून त्यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे.
