संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 18 : अनंत श्री. विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे 23 नोव्हेंबर 2025 रोजी प्रवचन व दर्शन सोहळा होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आज शृंगारतळी वेळंब रोड येथील कुंजवन सभागृह येथे संपन्न झाली. Planning meeting for Narendracharyaji’s program

सदर बैठकीमध्ये कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन तसेच कार्यक्रमाचा चालू असलेला प्रचार प्रसार, कार्यक्रमासंदर्भातील तालुक्यातील गावोगावी चालू असणारी प्रवचन या संदर्भात आढावा घेण्यात आला. व 23 नोव्हेंबर रोजी बाजारपेठेमध्ये योग्य पद्धतीने कसे नियोजन करता येईल. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचा संपूर्ण आढावा जिल्हा सेवा समिती तसेच गुहागर तालुका सेवा समिती यांच्याकडून घेण्यात आला. Planning meeting for Narendracharyaji’s program

सदर बैठकीसाठी जिल्हा सेवा अध्यक्ष दत्तात्रय मोरे, जिल्हा निरीक्षक दीपक तावडे, युवा पिठ निरीक्षक सुनील वीर, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख गुळेकर, उत्सव कमिटी अध्यक्ष दिलीप बागकर, संस्थानाचे प्रोटोकॉल अधिकारी भाई कदम व कारकर साहेब, तालुका सेवा अध्यक्ष धनश्री मांजरेकर व तालुक्यातील भक्त शिष्यगण बहूसंख्येने उपस्थित होते. Planning meeting for Narendracharyaji’s program
