गुहागर, ता. 29 : कोरोना संकट आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एस. टी. महामंडळाचे बिघडलेले आर्थिक गणित अजुनही जागेवर आलेले नाही. विविध आगारांमधून टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास काढुनही विद्यार्थ्यांना भर पावसात पायपीट किंवा खासगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत आहे. Pipet to students due to lack of ST

गुहागर आगारात टायर, इंजिन ऑइल, पॉवर स्टेरिंग ऑइल, सस्पेशन स्प्रिंगा, ट्यूब, ट्यूब फ्लॅप आदी अनेक साहित्याची कमी आहे. त्यामुळे 25 हून अधिक गाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम थेट विद्यार्थी वहातूक सेवेवर होत आहे. त्यात पुन्हा आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रेसाठी गुहागर आगारातून गाड्या पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे आधील विस्कळीत असलेले वेळापत्रकात दोन दिवसांची भर पडणार आहे. Pipet to students due to lack of ST

रानवी येथील बालभारती पब्लिक स्कुलमध्ये गुहागरमधील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी जातात. त्यांची शाळा दुपारी 2 वा. सुटते. या विद्यार्थ्यांना पुन्हा गुहागरला येण्यासाठी असलेली बस गेले तीन दिवस सायंकाळी 4.00 नंतर गुहागरला आली. त्यामुळे वैतागलेल्या महिला पालकांनी आगार व्यवस्थापक वैभव पवार यांची भेट घेतली. सकाळी 7 पासून केवळ डबा घेऊन गेलेली मुले घरी आल्यानंतर इतकी कंटाळून जातात की रात्री न जेवता, अभ्यास न करता झोपतात. अशी व्यथा डॉ. सौ. बलवंत, डॉ. सौ. काळे, सौ. मोरे व सौ. कामेरकर यांनी मांडली. Pipet to students due to lack of ST

काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनीही आगार व्यवस्थापकांना बंद असलेल्या ग्रामीण भागातील फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे सांगितले. फेऱ्या सुरु करण्याबाबत निवेदन दिल्यानंतर ठाकूर म्हणाले की, शृंगारतळी येथील शाळा, कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एस.टी.चे पास काढलेत. परंतू एस.टी. येत नसल्याने अनेक मुलांना पायपीट करावी लागत आहे. खासगी वहातुकीवर अवलंबून रहावे लागत आहे. Pipet to students due to lack of ST

याबाबत आगार व्यवस्थापक म्हणाले की, आगारात कमी असलेल्या साहित्याबाबत वरिष्ठांकडे मागणी केली आहे. अनेक अडचणींचा सामना करत वेळापत्रक पुर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. Pipet to students due to lack of ST