गुहागर, ता. 16 : राष्ट्र सेविका समितिचा रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारंभिक वर्ग नुकताच श्री गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प, गोळवली येथे पार पडला. या वर्गाला जिल्ह्यातील 74 वर्गार्थी उपस्थित होत्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गाथा क्रांतिवीरांची या विषयावर कार्यशाळा घेऊन एक हस्तलिखित तयार करण्यात आले. Personality Development Camp
राष्ट्र सेविका समितीतर्फे दरवर्षी मुलींसाठी वर्ग आयोजित केला जातो. यावर्षीचा वर्ग संगमेश्र्वर तालुक्यातील गोळवली गावातील श्री गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पस्थानी दि.५ मे ते १० मे २०२२ या कालावधीत संपन्न झाला. Personality Development Camp
या वर्गात रत्नागिरी,राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण,खेड, गुहागर, दापोली या तालुक्यातून एकूण ७४ वर्गाथी उपस्थित होत्या. वर्गाची मध्यवर्ती कल्पना ‘भारत हमारी मा है ‘ ही होती. शारिरीक आणि मानसिक संस्कारांसाठी विविध कार्यक्रमाची रचना वर्गात करण्यात आली होती. सकाळी आणि सायंकाळी दोन तास मैदानावर कार्यक्रम होत. त्यामध्ये व्यायाम, स्वसंरक्षणासाठी लाठी फिरवणे, नि:युद्ध म्हणजे कराटे, प्राणायम आणि विविध मैदानी खेळांचा समावेश होता. तर दुपारची सत्रांमध्ये राष्ट्र सेविका समितीचा परिचय करुन देणारी व्याख्याने, वेगवगेळ्या विषयावरील चर्चासत्रे तर रात्री भोजनानंतरच्या सत्रात कथाकथनासारखे मनोरंजन व माहिती देणारे कार्यक्रम असे सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. Personality Development Camp
हे वर्ष भारताला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने वर्गातही स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक या विषयावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनींच्या हस्तलिखितातील पुस्तक तयार करण्यात आले. Personality Development Camp
वर्गामध्ये ५ शिक्षिकांनी काम केले. वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून राष्ट्र सेविका समितिच्या गोवा विभाग कार्यवाहिका मा. सुनंदा ताई आमशेकर, रा. गोवा या उपस्थित होत्या. त्यांनी सेविकांना मार्गदर्शन केले. अतिशय उत्साहात वर्ग संपन्न झाला. Personality Development Camp