• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत सरपंच व सदस्याची ग्रामस्थांना मारहाण

by Mayuresh Patnakar
January 5, 2023
in Guhagar
743 8
0
People's representatives beat the villagers

People's representatives beat the villagers

1.5k
SHARES
4.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विजय नागवेकरची गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेत गावातील एका शाळेच्या शौचालय दुरुस्तीसंदर्भात ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसणार होते. नागवेकर यांनी या उपोषणात भाग घेऊ नये म्हणून पालशेतच्या सरपंच सौ. संपदा चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे आणि संदीप चव्हाण यांनी नागवेकर कुटुंबाला मारहाण केली. People’s representatives beat the villagers. अशी तक्रार विजय नागवेकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे.

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गेले काही दिवस पालशेत काळेवठार शाळेच्या आवारातील शौचालयाच्या कामात झालेला घोटाळा गाजतो आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी 2 जानेवारील पालशेत ग्रामपंचायतीमधील उपसरपंच महेश वेल्हाळ,  ग्रामपंचायत सदस्य  मिनार आरेकर आणि ग्रामस्थ उपोषणाला बसणार होते. या उपोषणात विजय नागवेकर, अजय नागवेकर हे दोघेही सहभागी होणार होते. People’s representatives beat the villagers

People’s representatives beat the villagers

या पार्श्र्वभुमीवर 1 जानेवारी रात्री 8.45 वा पालशेतच्या सरपंच सौ. संपदा चव्हाण, त्यांचे पती संदीप चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य पंकल बिर्जे हे विजय नागवेकर यांच्या घरात शिरले. आणि उद्या तू उपोषणाला बसायचे नाहीस, तु उपोषणातून माघार घे असे सांगू लगले. यावर विजय नागवेकर यांनी आम्ही उपोषणाला बसणारच असे ठणकावून सांगितले. या विषयावरुन पंकज बिर्जे, सौ. संपदा चव्हाण आणि संदिप चव्हाण यांच्याबरोबर विजय नागवेकर यांची शाब्दीक बोलाचाली सुरु होती. हा वाद थांबविण्यासाठी विजय नागवेकर यांची आई समजाविण्यासाठी आली. त्यावेळी पालशेत ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संपदा संदीप चव्हाण यांनी विजय नागवेकर यांच्या आईची मान पकडली. पंकज बिर्जे यानी धक्का देवून ढकलून दिले. त्यावेळी अजय नागवेकरने आईला सावरले. त्याचवेळी संदीप चव्हाण यांनी विजय नागवेकर आणि त्यांच्या कुटुंबियांना शिविगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. संदीप चव्हाण, सौ. संपदा चव्हाण आणि पंकज बिर्जे यांनी विजय नागवेकर आणि अजय नागवेकर यांना मारण्यास सुरवात केली. या मारहाणीत तिघांनाही मुका मार लागला. अशी तक्रार विजय नागवेकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. People’s representatives beat the villagers

गुहागर पोलीसांनी सदर तक्रार दाखल करुन घेत सौ. संपदा चव्हाण, संदीप चव्हाण आणि पंकज बिर्जे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अधिनियम 1860 कलम 323, 34, 451, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार दिपक साळवी करत आहेत. People’s representatives beat the villagers

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPeople's representatives beat the villagersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share584SendTweet365
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.