केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे खा. पवार यांचे आश्वासन
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा. यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री. भास्करराव जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे अडचणीत आलेला प्रकल्पही चालू राहिला पाहिजे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. याचसाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार श्री शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी श्री. पवार साहेब यांनी याप्रश्नी लवकरच दिल्लीमध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पूरी (Hardeep Singh Puri, Minister of Petroleum and Natural Gas) यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. असे आश्वासन दिले. या बैठकीला आरजीपीपीएलचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. (Pawar assured Jadhav to solve RGPPL problems)
गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट (RGPPL) हा १९६७ मेगावॅट क्षमता असलेला गॅसवर आधारित भारतातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु, गॅसची वाढलेली किंमत आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्त असल्याने वीज खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे.
रत्नागिरी गॅस अँड पावर प्रोजेक्टचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसोबत (MSEB) सन २०३२ पर्यंत वीज खरेदीचा करार असताना महावितरणने सन २०१४ पासून वीज खरेदी थांबवली. दुसरीकडे भारतीय रेल्वेसोबतचा (Indian Railway) करार मार्च 2022 मध्ये संपला. त्यामुळे आरजीपीपीएलमध्ये सुरू असलेले ५४० मेगावॅट वीज उत्पादनही थांबले. परिणामी हा प्रकल्प सद्यस्थितीत खूपच अडचणीत आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
Pawar assured Jadhav to solve RGPPL problems
कंपनीतील कर्मचार्यांच्या पाठीशी आमदार श्री. भास्करराव जाधव हे ठामपणे उभे आहेत. त्यांचा रोजगार (Employment) टिकून राहावा. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर प्रकल्पही सुरू राहिला पाहिजे यासाठी त्यांनी ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते मुंबईत अनेकांना भेटले. त्यात आज खासदार श्री. पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता, कंपनीचे सल्लागार हिरानंद हरचंदानी, सहाय्यक व्यवस्थापक सबरी गिरीश एन. हेदेखील उपस्थित होते.
आज आरजीपीपीएलकडे वेगवेगळ्या राज्यातून विजेची (Electric Supply) मागणी आहे. परंतु वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला गॅस (LNG) कमी किंमतीत उपलब्ध होत नाही. कंपनीचे अधिकारी त्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात त्यांना यश येत नाही. ही बाब आमदार श्री जाधव यांनी श्री. पवार यांच्याकडे मांडली आणि यावर मार्ग काढण्याची विनंती केली. Pawar assured Jadhav to solve RGPPL problems
श्री. पवार यांनी हा संपूर्ण विषय अत्यंत गांभीर्याने समजून घेतला आणि आमदार भास्करराव जाधव, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना लवकरच दिल्लीमध्ये बोलावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पूरी (Hardeep Singh Puri, Minister of Petroleum and Natural Gas) यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. बैठकीत झालेल्या आश्वासक चर्चेमुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत समाधानी झाले. ही बैठक घडवून आणण्यास पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आमदार श्री भास्करराव जाधव यांचे आभार मानले. Pawar assured Jadhav to solve RGPPL problems
संबंधित बातम्या (या बातम्या वाचण्यासाठी हेडलाईनवर क्लिक करा.)
करार न वाढविल्याने कर्मचारी बेरोजगार