गुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळयासाठी सूचना असल्यास ३० जूनपर्यंत कळवावे
रत्नागिरी, ता. 26 : भारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सभेत माजी विद्यार्थी मंडळाने गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुयोग्य जागेची मागणी केली होती. त्यानुसार सभा अध्यक्ष तथा संस्थेच्या चेअरमन सौ. नमिता किर यांनी पटवर्धन हायस्कूलच्या ( Patwardhan High School ) प्रागंणात सुयोग्य जागा देण्याचे निश्चित केले आहे. Resolution for space

कोल्हापूर येथे पुतळयाचे काम सुरू असून सुरवातीचे मातकामाचे मॉडेल तयार झाले आहे. मंडळाने गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांचे विद्यार्थी, त्यांच्या कार्यकालातील शिक्षक, आप्तेष्ट व मित्रपरिवारातील लोकांना तयार होणाऱ्या पुतळयासाठी काही सूचना करावयाच्या असल्यास ३० जूनपर्यंत कळविण्यात यावे. त्यासाठी शैलेंद्र चंद्रकांत डोंगरसाने, ८५२/९ बी वॉर्ड, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल शेजारी, सुभाष रोड, कोल्हापूर-४१६ ००२, मोबाईल नं.- ९८५००६०७८९, ७०२०५३०४७१ येथील पुतळा पाहावा. Resolution for space
पुतळयासाठी आवश्यक बदल वाटल्यास डॉ. दिलीप नागवेकर (९४२११३७७६९), संतोष कुष्टे (९४२३२९१८८१), मरिनर दिलीप भाटकर (९८२३१२००८९) आणि विनायक हातखंबकर (९९७०३२३५४५) यांच्याशी संपर्क करून कळवावे. Resolution for space

