• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपा जिल्हा संयोजक पटवर्धन यांनी केला नगरसेवकांचा सत्कार

by Guhagar News
December 23, 2025
in Ratnagiri
69 1
0
Patwardhan felicitated the corporators
136
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 23 : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांचा सन्मान सोमवारी सायंकाळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. Patwardhan felicitated the corporators

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच नगरसेविका म्हणून प्रभाग १५ मधून निवडून आलेल्या सौ. वर्षा ढेकणे आणि प्रभाग १ मधून नितीन जाधव, प्रभाग १० मधून नगरसेविका सौ. मानसी करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, प्रभाग ११ मधून सौ. सुप्रिया रसाळ आणि नगरसेवक समीर तिवरेकर यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला. भाजपने महायुतीमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली व सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. तसेच नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांना देखील प्रत्येक प्रभागातून मताधिक्य दिले आहे. याबद्दल भाजपच्या सर्व नगरसेवकांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी स्वामी व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज तसेच भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप रसाळ, सचिन करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते. Patwardhan felicitated the corporators

या वेळी ॲड. दीपक पटवर्धन यांनी सर्व नगरसेवक, नगरसेविकांचे अभिनंदन करून चांगल्या मताधिक्याने यश मिळवल्याबद्दल कौतुक केले. प्रभागाच्या विकासासाठी काम करावेत. चांगल्या योजना प्रभागासाठी आणाव्यात, प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. रस्ते विकास, गटार बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य याकडे विशेष लक्ष द्यावेत. रत्नागिरी नगर परिषदेत चुणूक दाखवावी, अशी सूचनाही ॲड. दीपक पटवर्धन यांनी या वेळी केली. या वेळी नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रिया तसेच प्रचारादरम्यान आलेले अनुभव सांगितले. Patwardhan felicitated the corporators

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPatwardhan felicitated the corporatorsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.