गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व इंग्लिश मिडीयम या शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वरवेली येथील एका सेंद्रिय शेतीच्या प्रकल्पाला शैक्षणिक क्षेत्रीय भेट दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान, पद्धती आणि त्याचे महत्त्व याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. Patpanhale students visit organic farming
यावेळा शेतकरी किर्वे यांनी विद्यार्थ्यांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व सेंद्रिय शेतीमुळे मिळणारे पोषक आणि सुरक्षित अन्न याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शेणखत निर्मिती, सेंद्रिय खते, जैविक कीडनियंत्रण या बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शेतातील फळबाग, भाजीपाला तसेच औषधी वनस्पतींचे निरीक्षण केले. पर्यावरणपूरक शेतीचे ज्ञान घेताना त्यातून उत्पन्न होणाऱ्या अन्नाच्या पोषक तत्वांची माहिती घेतली. Patpanhale students visit organic farming

मुख्याध्यापिका संदिकर यांनी शेतकरी किर्वे व त्यांचे साथीदार यांचे विद्याध्यर्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनासाठी आभार मानले व अशा अजुन सकारात्मक परिणाम करणाऱ्या क्षेत्रभेटी आपण आयोजित करू. अशी हमी दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण व शाश्वत शेती यांचे महत्त्व समजले. Patpanhale students visit organic farming