71 कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी
गुहागर, ता. 25 : येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुरूस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील 11 आणि खालच्या भागातील 60 अशी एकूण 71 घरांच्या स्थलांतराची तयारी ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्या अनूषंगाने निवारा केंद्र उभारून त्या कुटुंबातील पूर्ण व्यवस्था करण्याचा निर्णय दि. 23 रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पर्यायी मार्गही सुस्थितीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली. अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. Parashuram Ghat is still in poor condition


मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट अतिशय धोकादायक बनला आहे. वारंवार दरड कोसळून वाहतूक खोळंबा होत होता. येत्या पावसाळ्यामध्ये ते अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे परशुराम घाटाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. घाटाच्या वरच्या भागातील दरडी कधीही घसरण्याची शक्यता होती. हा धोका कमी करण्यासाठी ती दरडी हटवण्याचे काम हाती घेऊन चौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. मात्र काम सुरू असतानाच जेसीबी घसरून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एक कामगाराला जीव गमवावा लागला. दरडी हटवण्याचे काम मोठे होते. आणि पावसापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे होते. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करून हे काम वेगाने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. Parashuram Ghat is still in poor condition
त्यानंतर 3 ते 25 मे पर्यंत परशुराम घाटातील वाहतूक सकाळी 11 ते सायं. 6 या दरम्यान बंद केली. दरम्यान, दरडी घसरण्याची शक्यता गृहित धरून घाटावरील 11 आणि खालच्या भागातील 60 घरांतील कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी ठेवली आहे. या कुटुंबीयांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी निवारा शेड उभारून त्याठिकाणी त्यांची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी ठेवली आहे. पर्यायी रस्ताही सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने बांधकाम विभागाला दिल्या आहेत. Parashuram Ghat is still in poor condition
त्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, पावसापूर्वी परशुराम घाटातील काम पूर्ण होईल. मात्र ते तेवढे सुरक्षित असेल, याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून प्रशासन म्हणून आम्ही तयारी ठेवली आहे. Parashuram Ghat is still in poor condition