• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर वारी

by Mayuresh Patnakar
June 25, 2022
in Ratnagiri
17 0
0
Pandharpur Wari of cyclists

दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर वारी

33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. ह्या पंढरीच्या वारीची थोरवी महती सांगावी तितकी थोडीच, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. या आषाढी वारीमध्ये खूप जनसमुदाय सहभागी होतो. १८ व १९ जून २०२२ रोजी दापोलीतील सायकलप्रेमींनी पुणे पंढरपूर पुणे असे तब्बल ४६० किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. Pandharpur Wari of cyclists

Pandharpur Wari of cyclists
दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर वारी

इंडो एथलेटिक सोसायटी (Indo Athletic Society) तर्फे पुणे पंढरपूर पुणे या मार्गावर सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. या सायकल वारी मध्ये दापोली सायकलिंग क्लबतर्फे ६ जणांची टीम सहभागी झाली होती. यामध्ये साईप्रसाद उत्पल वराडकर (वय १२ वर्षे), स्वानंद जोशी यांनी पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी एका दिवसात पूर्ण केली. तसेच मृणाल मिलिंद खानविलकर, आकाश तांबे, भावेश मंडपे, अंबरीश गुरव यांनी पुणे- पंढरपूर- पुणे अशी सायकल वारी दोन दिवसात पूर्ण केली. भावेश मंडपे यांनी ही सायकल वारी सिंगल गिअर सायकलने केली. Pandharpur Wari of cyclists

Pandharpur Wari of cyclists
दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर वारी

याबद्दल अधिक माहिती देताना मृणाल खानविलकर यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर पुणे या ४६० किमीच्या वारी मार्गावर सायकल चालवत सायकल वारी केली. यामध्ये दोन दिवस आम्ही प्रत्येकी २३० किमी सायकल चालवली. यासाठी आम्ही काही दिवसापासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे. Pandharpur Wari of cyclists

Tags: GuhagarGuhagar NewsIndo Athletic SocietyLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPandharpur Wari of cyclistsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.