• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत संघ नगरसेवक चषकाचा मानकरी

by Ganesh Dhanawade
March 2, 2022
in Guhagar
16 0
0
Palshet Sangh Corporator Cup Manakari

मारुती छाया क्रिकेट संघ गुहागर आयोजित नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मारुती छाया क्रिकेट संघ आयोजित; असगोली सागरपुत्र संघ उपविजेता

गुहागर, दि. 02 : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दोन दिवस क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात आल्या होत्या. या नगरसेवक (Corporator) चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये पालशेत महालक्ष्मी येथील श्री झोलाई देवी संघाने असगोलीच्या सागरपुत्र क्रिकेट संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत तालुक्यातील 30 संघांनी सहभाग घेतला होता. Palshet Sangh Corporator Cup Manakari

गुहागर नगरपंचायतीचे माजी स्वच्छता आणि आरोग्य सभापती आणि प्रभाग १६ मधील कार्यतत्पर नगरसेवक अमोल गोयथळे (Corporator Amol Goythale) यांच्या सहकार्याने खालचापाट भाटी येथे नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या श्री झोलाई संघाने कामगार सेने पालशेत संघावर तर सागरपुत्र संघाने श्री कीर्तनवाडी (अ) संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. Palshet Sangh Corporator Cup Manakari

Palshet Sangh Corporator Cup Manakari
मारुती छाया क्रिकेट संघ गुहागर आयोजित नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

विजेत्या संघाला रोख रक्कम 7007/- चषक, उपविजेत्या संघास 5005/- व चषक देऊन गौरविण्यात आले. Palshet Sangh Corporator Cup Manakari

Palshet Sangh Corporator Cup Manakari
मारुती छाया क्रिकेट संघ गुहागर आयोजित नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सागरपुत्र संघाचा निखिल कटनाक, गोलंदाज झोलाई संघाचा बंटी पालकर, क्षेत्ररक्षण म्हणून तुषार दाभोळकर, सामनावीर झोलाई संघाचा शुभम पालकर, मालिकविर पालशेत संघाचा ओंकार देवाळे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे सूत्रसंचालन राज विखारे, अरुण भागडे, सुयोग आरेकर यांनी केले. Palshet Sangh Corporator Cup Manakari

Palshet Sangh Corporator Cup Manakari
मारुती छाया क्रिकेट संघ गुहागर आयोजित नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगरसेवक अमोल गोयथळे, किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे, अनंत धनावडे, रवींद्र विखारे, प्रवीण घाडे, सुनील गोयथळे, प्रकाश गोयथळे, सुभाष घाडे, दिलीप गोयथळे, उमेश गोयथळे, एकनाथ जाधव, गणपत जांगळी, गुहागर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे, योगेश गोयथळे, श्री. ढेरे, जयंत मालप, अनंत मालप, श्रीधर कुळे, प्रवीण जांगळी, विद्याधर गोयथळे, विजय देवाळे, विवेक मोरे, अमरदीप जाधव, सुहास जोशी, राज विखारे, दिपक जाधव, विजय जाधव, चंद्रशेखर लोखंडे, निलेश लोखंडे, शैलेश उदेग, शैलेश पाष्ठे, शैलेश उदेग, धनंजय लोखंडे, निखिल रेवाले, उमेश कुळे, सिद्धार्थ वराडकर, सोहम कणगुटकर, शुभम शेटे, सागर पाडावे, साहिल लोखंडे आदी उपस्थित होते. Palshet Sangh Corporator Cup Manakari

Tags: Amol GoythaleCorporatorGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPalshet Sangh Corporator Cup Manakariटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.