गुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्वितीय वारशाचे स्मरण करून, त्यांच्या शिकवणीप्रमाणे सत्य, प्रेम व एकतेचा संदेश पसरविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केला. Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

सोहळ्याची सुरुवात मंगलमय वातावरणाने गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” या गजरात झाली. पालखीचे सुशोभित रथ, फुलांनी सजवलेली माऊलींची पालखी आणि भजन-कीर्तनांचा सोहळा गावभर दिंडीतून निघाला. या वेळी गावातील महिला भगिनींनी फुगडी व नृत्यांनी सोहळ्याला रंगत आणली. Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक वर्ग विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,स्थानिक मंडळे तसेच सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला. संतांच्या कार्याचा, भक्तीमार्गाचा आणि समाज प्रबोधनाच्या विचारांचा ऊहापोह करण्यात आला. शेवटी पसायदानाने विठ्ठल रखुमाई मंदिर जाधव वाडी येथे कार्यक्रमाची सांगता झाली. Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti